आमदार श्वेता महाले पाटील

कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: ग्रामीण भागातील महिलांना कर्जाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारात अडकवून वसुलीसाठी त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका...

कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil

 

अभद्र वागणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा; तहसीलदारांना कठोर कारवाईचे सक्त निर्देश

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : ग्रामीण भागातील महिलांना कर्जाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारात अडकवून वसुलीसाठी त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतली आहे. मंगरूळ येथील अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या त्रासाविरोधात आवाज उठवल्यानंतर आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच चिखली तहसीलदारांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित कंपन्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले.

सध्या ग्रामीण भागात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतीतून उत्पन्न नाही, हाताला काम नाही, अशा परिस्थितीत घरखर्च भागविणेही महिलांसाठी कठीण झाले आहे. अनेक महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, काही मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार फोन करून, घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना अशा पद्धतीने मानसिक त्रास देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुलीविरोधात कठोर भूमिका घेतली असून, कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावणे, जबरदस्ती करणे किंवा मानसिक त्रास देणे असे प्रकार घडल्यास पोलिसांनी तक्रारींची तातडीने दखल घेऊन गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश दिले आहेत. संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) दिला आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि कर्जदारांवर वसुलीसाठी दबाव आणू नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांना त्रास देऊ नये, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असताना चिखली मतदारसंघातील महिलांवर अन्याय होऊ नये, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. महिलांनी आपल्या अडचणी निर्भयपणे मांडाव्यात, प्रशासनाने त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कोणत्याही महिलेला कर्जवसुलीच्या नावाखाली अपमानास्पद वागणूक मिळू नये, यासाठी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांनीही महिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. महिलांना वारंवार फोन करून, त्यांच्या घरी जाऊन किंवा कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास देण्याचे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत. आज लोकशाही मार्गाने निवेदन देऊन प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे; मात्र महिलांचा छळ सुरूच राहिला तर भारतीय जनता युवा मोर्चा महिलांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका संतोष काळे पाटील यांनी मांडली.

यावेळी ग्रामीण कुटा फायनान्स, चैतन्य फायनान्स, स्मॉल फायनान्स, एचडीएफसी बचत गट फायनान्स, आय मायक्रो फायनान्स यांसह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या. या प्रकरणी चिखली तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. महिलांना त्रास देणाऱ्या प्रतिनिधींची चौकशी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

महिलांचा सन्मान आणि त्यांचा आत्मसन्मान जपणे ही प्रशासनाचीही जबाबदारी आहे. कर्ज घेतले म्हणून कोणालाही महिलांच्या दारात जाऊन त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना मानसिक त्रास देण्याचा अधिकार मिळत नाही. संकटाच्या काळात ग्रामीण महिलांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे यासाठी आपण ठामपणे प्रयत्नशील आहोत, अशी भूमिका आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतली.

महिलांच्या आर्थिक अडचणींची जाणीव ठेवून त्यांना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे. कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

टैग्स: MLA Shweta Mahale Patil

संबंधित सामग्री

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

MLA Shweta Mahale Patil: संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बुलढाणा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी विशेष समन्वय बैठक धाड येथे आ. श्वेता महाले पाटील...

Nov 04, 2026
पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी...

Nov 01, 2026
दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये..

Oct 14, 2026
बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

Sep 24, 2026
पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

MLA Shweta Mahale Patil: शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल

Sep 20, 2026