शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना वाचविण्याची भूमिका;
पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन
चिखली (MLA Shweta Mahale Patil) : पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळाले पाहिजे, याला आपला कोणताही विरोध नसून धरणातून खालच्या भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यापूर्वी वरच्या भागातील शेतकऱ्यांचे बंद करण्यात आलेले पाणी कनेक्शन पुन्हा जोडण्यात यावेत. तसेच उपलब्ध पाण्याचे वरच्या आणि खालच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये समन्यायी वाटप करण्यात यावे, अशी मागणी (MLA Shweta Mahale Patil) त्यांनी केली.
पेनटाकळी धरणाला नुकतीच भेट दिल्यानंतर बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, धरणातील आरक्षित पाणी वगळता शिल्लक असलेले पाणी खाली सोडण्याबाबत काही निर्णय झाल्याचे आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पाणी सोडताना वरच्या भागातील ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद करण्यात आले आहेत, त्यांचाही विचार होणे आवश्यक आहे. शेतकरी हा कोणत्याही तालुक्याचा असो, त्याच्या पिकांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे (MLA Shweta Mahale Patil) त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या परिस्थितीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, बुलढाणा जिल्ह्यात सध्या परिस्थिती काहीशी बरी वाटत असली तरी वाढते तापमान आणि उन्हाची तीव्रता पाहता आगामी काळात पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत दुष्काळासंदर्भातील विविध विषयांवर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. प्रशासन आणि सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियोजन करावे. त्याचबरोबर पाण्याची बचत करणे, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देणे आणि त्यानंतर शिल्लक पाण्यातून शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करणे ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे, असेही त्या (MLA Shweta Mahale Patil) म्हणाल्या.
पेनटाकळी धरणाच्या प्रश्नावर माजी आमदार संजय रायमूलकर हे धरणाच्या पात्रात आमरण उपोषणाला बसणार असल्याबाबत विचारले असता, शेतकऱ्यांसाठी ते उपोषण करीत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार श्वेता महाले यांनी दिली. मात्र, खालच्या भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच वरच्या भागातील शेतकऱ्यांचाही विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना जात, धर्म आणि पक्ष नसतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना तालुक्याचीही मर्यादा नसते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे संवेदनशीलतेने पाहून पाण्याचे समन्यायी वाटप करणे आवश्यक आहे, असे त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) ठामपणे सांगितले.
शेतकऱ्यांचे उभे पीक वाचविणे महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी कोणत्याही भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. वरचे असोत किंवा खालचे, सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी स्पष्ट केले.