आमदार संतोष बांगर

दिवाळीनिमित्त आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप 

MLA Santosh Bangar: कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आमदार संतोष बांगर यांच्या वतीने औंढा नागनाथ शहरातील गरजू  कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिधावाटप

दिवाळीनिमित्त आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप 

MLA Santosh Bangar

 

६५०० हजार कुटुंबांना शिधावाटप

औंढा नागनाथ (MLA Santosh Bangar) : येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आमदार संतोष बांगर यांच्या वतीने औंढा नागनाथ शहरातील गरजू  कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिधावाटप उपक्रम घेण्यात आला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या हस्ते  दिनांक ५ नोव्हेंबर रोजी ६,५०० कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.यामध्ये रवा मैदा तांदूळ तेल उठणे  साबण साखर यासह इतर सामान याचा समावेश होता.

 येथील सहा हजार पाचशे गरजू कुटुंबांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. लाडकी बहीण, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करता यावा, तसेच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार द्यावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा आनंदाचा शिधा उपक्रम राबविला आहे.

याप्रसंगी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) माजी आमदार डॉ. संतोष टारफे, युवा जिल्हाप्रमुख राम कदम, श्रीराम दादा बांगर, शिवसेना नेते सुभाषराव बांगर, स्वराज बांगर, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख नगरसेवक साहेबराव देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख, श्रीराम दादा राठी, शिवसेना नेते राम नागरे,  युवासेनेचे विजय देशमुख, नगरसेवक अनिल देव, राहुल दंतवार ,दिलीप राठोड, विष्णू पवार, प्रदीप कनकुटे ,आजू इनामदार, शफी नदाफ,संदीप  गोबाडे, प्रदीप गंभीरे, बाळासाहेब ठाकूर ,श्रीनिवास राठी, सुमेध मुळे यशवंत साळवे रक्षक गायकवाड बाबा डांगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: MLA Santosh Bangar

संबंधित सामग्री

आग लागून नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी आ. संतोष बांगर आले धाऊन 

आग लागून नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी आ. संतोष बांगर आले धाऊन 

MLA Santosh Bangar: अचानक आग लागून पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली यात लाखो रुपये नुकसान झाले आग लागून नुकसान झालेल्यांना १३ नोव्हेंबर शुक्रवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. संतोष बांगर

Nov 13, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे: आ. संतोष बांगर

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना, अशा परिस्थितीत खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये...

Oct 25, 2026
मंत्रिमंडळ विस्तार : आ. संतोष बांगर यांना संधी मिळाल्यास तीन जिल्ह्यात वाढेल पक्षाचे बळ

मंत्रिमंडळ विस्तार : आ. संतोष बांगर यांना संधी मिळाल्यास तीन जिल्ह्यात वाढेल पक्षाचे बळ

MLA Santosh Bangar: राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेत भाकर फिरविणार असल्याचे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केल्यापासून शिवसैनिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर

Oct 19, 2026
माहूरच्या रेणुका देवी चरणी आमदार संतोष बांगर यांचे राज्यातील बळीराजासाठी घातले साकडे

माहूरच्या रेणुका देवी चरणी आमदार संतोष बांगर यांचे राज्यातील बळीराजासाठी घातले साकडे

MLA Santosh Bangar: हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवीच्या चरणी राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून सावरण्यासाठी साकडे घातले.

Oct 11, 2026
आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात

Sep 30, 2026