आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

परभणीत कामात कसलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: आ. डॉ. गुट्टे

MLA Dr. Ratnakar Gutte: दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होता कामा नये. प्रशासनाने नागरिक आणि शासन यांच्यातील दुवा

परभणीत कामात कसलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: आ. डॉ. गुट्टे

MLA Dr. Ratnakar Gutte

 

पाणीटंचाई, दुष्काळ आढावा बैठक अधिकारी, कर्मचार्‍यांना घेतले पैलावर

गंगाखेड (MLA Dr. Ratnakar Gutte) : दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होता कामा नये. प्रशासनाने नागरिक आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून जबाबदारीने काम करावे. तलाठ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहून नागरिकांची महसूलविषयक कामे वेळेत पूर्ण करावीत. प्रशासकीय कामकाजात दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा नागरिकांची अडवणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा (MLA Dr. Ratnakar Gutte) आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला.

शहरातील कापसे गार्डन अ‍ॅण्ड मंगल कार्यालय येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली गंगाखेड तालुकास्तरीय पाणीटंचाई व दुष्काळ आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी नागरिक, शेतकरी आणि संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तलाठी कार्यालयांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्यांचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावातील बोअर अधिग्रहण, पाणीपुरवठा व इतर मूलभूत समस्या पाच दिवसांच्या आत मार्गी लावाव्यात.

तलाठ्यांनी फेरफाराची प्रकरणे १५ दिवसांत निकाली काढावीत, तसेच बळीराजाची कामेही वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांकडून कामांसाठी पैसे घेणे बंद झाले पाहिजे. जनतेची अडवणूक करणार्‍या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्‍याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयाने काम केल्यास दुष्काळाच्या संकटावर मात करता येईल. वीज, पाणी, महसूलविषयक कामे आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य व पाठबळ देण्यास आपण २४ तास उपलब्ध आहोत. मात्र, जनतेची कामे प्रलंबित ठेवणे किंवा जबाबदारी झटकणे सहन केले जाणार नाही. पदापेक्षा जनतेचा विश्वास आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक महत्त्वाची असल्याचे (MLA Dr. Ratnakar Gutte) आ. डॉ. गुट्टे यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, सभापती साहेबराव भोसले, जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण मुंडे, उपसभापती संभाजी पोले, पंचायत समिती सभापती मनोज मुंडे, जिल्हा परिषद सदस्य सय्यद अल्ताफ, उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे, उपसभापती रमेश खांडेकर, मित्रमंडळाचे जिल्हा प्रभारी बालाजी मुंडे, तालुका प्रभारी बालाजी लटपटे, शहराध्यक्ष सय्यद अकबर, विधानसभा संपर्कप्रमुख गोविंदराव यादव, तालुकाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, पंचायत समिती सदस्य दासराव भोसले, नगरसेवक प्रताप मुंडे, बाळासाहेब बोडके, संदीप राठोड, नागनाथ कासले, उद्धव शिंदे, राजू खान, प्रमोद साळवे, पंचायत समिती सदस्य प्रतापराव कदम, सुरेश चव्हाण, विजय मुंडे, श्रीकांत गायकवाड, धम्मा पवार, तुकाराम पाटील यांच्यासह महसूल, पंचायत, सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक आणि शेतकरी उपस्थित होते.

टैग्स: MLA Dr Ratnakar Gutte