जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस.एन. मानेकर - गाडेकर यांनी सुनावला निकाल
हिंगोली (Minor Girl Abuse Case) : जिल्ह्यातील एका ठिकाणच्या जन्मदात्या पित्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकरणात १७ ऑक्टोंबर शनिवार रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्रीमती एस.एम. माने- गाडेकर यांनी आरोपी जन्मदात्या पित्याला दोषी ठरवून नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावास व १ लाख २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत जिल्हा सरकारी वकील अॅड. एन.एस. मुटकुळे यांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यातील एका गावामधील जन्मदात्या पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीला खान्यासाठी गुलाब जामून, भेळ व कलाकंदमध्ये गुंगीचे औषध दिल्याने अल्पवयीन मुलीला गुंगी येऊन ती अर्धवट झोपेत असताना १८ ते २० एप्रिल २०२३ या दरम्यानच्या कालावधीत तिच्या सोबत छेडछाड केली. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला त्रास होऊ लागला. त्यामुळे जन्मदात्याने तिच्यासोबत शारिरीक सबंध ठेवल्याचे लक्षात आले.
त्यानंतर २२ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलीच्या पोटावर बसुन ओढणीने तिचे दोन्ही हात बांधून तिच्यावर जन्मदात्याने जबरीने अत्याचार केल्यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास तुला जीवे ठार मारतो अशी धमकी देऊन तिला चापट बुक्याने मारहाण केली. या प्रकरणात पोलिस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पवयीन पिढीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून जन्मदात्या पित्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांनी सखोल तपास करून हिंगोली जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
१७ ऑक्टोंबर रोजी हिंगोलीच्या जिल्हा न्यायाधिश श्रीमती एन.एस. माने - गाडेकर यांनी आरोपी जन्मदात्या पित्याला दोषी ठरवून नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १ लाख २ हजार रुपये दंड ठोठावला. या सर्व शिक्षा एकत्र भोगावयाचा आदेश दिला. तसेच या प्रकरणातील पिढीत अल्पवयीन मुलीला शासनामार्फत मनोधैर्य योजनेमार्फत ५ लाख रुपयाची रक्कम ही आर्थिक मदत म्हणुन देण्याचे आदेश शासनाला दिले.
या (Minor Girl Abuse Case) तिन्ही प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. एन. एस. मुटकुळे यांनी १२ साक्षिदार तपासले. तसेच अंतिम युक्तीवाद सादर केला. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे पिढीत मुलीची साक्ष तपासिक अमलदार व इतर साक्षिदारांची साक्ष महत्वाची ठरली. सदर प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे, सहाय्यक सरकारी वकील श्रीमती सविता एस. देशमुख (जाधव) यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी पोलिस अंमलदार प्रमोद आश्रोबा मार्कड यांनी सहकार्य केले.