Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

माथा शिवार महाकाय अजगर

माथा शिवारात आढळला तब्बल ३४ किलोचा महाकाय अजगर

Matha Shiwar giant python: तालुक्यातील माथा शिवारातील वैभव बंगाळे यांच्या शेतात बुधवारी २३ सप्टेंबर रोजी तब्बल १३ फूट लांब आणि ३४ किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आला.


माथा शिवारात आढळला तब्बल ३४ किलोचा महाकाय अजगर

Matha Shiwar giant python |

 

१३ फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वन पर्यटन परिसरातील जंगलात सोडले

औंढा नागनाथ (Matha Shiwar giant python) : तालुक्यातील माथा शिवारातील वैभव बंगाळे यांच्या शेतात बुधवारी २३ सप्टेंबर रोजी तब्बल १३ फूट लांब आणि ३४ किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आला. सोयाबीनच्या शेतात फवारणीचे काम सुरू असताना शेतकऱ्याला अचानक हा अजगर दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अजगर आढळल्याची माहिती मिळताच औंढा नागनाथ येथील सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्पमित्र नवनाथ उर्फ सोनू लाड, विजयराज पाटील, उत्तम पाटील, नागेश गुरव, नागेश भैय्या, क्षीरसागर आणि मंगेश गुरव यांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडले.

पकडलेल्या अजगराला सुरक्षितपणे औंढा नागनाथ येथील वन पर्यटन परिसरातील जंगलात सोडून देण्यात आले. अजगराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, प्रदीप कनकुटे, राहुल दंतवार, पत्रकार गजानन नाईक, राहूल पवार, सचिन राठोड, बाळू तेली, नागेश गोरे,वैभव बंगाळे, मंगूसिंग ठाकूर, आत्माराम लाड, गोविंद देशमुख,नितीन पोले यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.