लातूर भीषण स्फोट

कुरिअरचे सामान उतरताना लातूरमध्ये स्फोट; दोघे जखमी

Latur Massive explosion: छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या पार्सलच्या डिलिव्हरीसाठी टेम्पोमधील सामान उतरणे सुरू असताना एका पार्सलचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन व्यक्तींना गंभीर दुखापत

कुरिअरचे सामान उतरताना लातूरमध्ये स्फोट; दोघे जखमी

Latur Massive explosion

 

पोलिसांच्या विविध तपास यंत्रणांच्या टीम्स तात्काळ घटनास्थळी

लातूर (Latur Massive explosion) : शहरातील विलासराव देशमुख मार्गावरील उमाटे कुरियर्स येथे शनिवारी (दि. 31) सकाळी दहाच्या सुमारास एक भीषण स्फोट झाला. छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या पार्सलच्या डिलिव्हरीसाठी टेम्पोमधील सामान उतरणे सुरू असताना एका पार्सलचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून कुरिअरच्या माध्यमातून एअर पिस्तूल पाठवण्यात आल्या होत्या. हे पार्सल गेल्या दोन दिवसांपासून दुकानाबाहेरील फुटपाथवर ठेवण्यात आले होते. उष्णतेमुळे पार्सलमधील एअर पिस्तूलसाठी वापरण्यात येणाऱ्या कार्बन डायऑक्साइड गॅसच्या सिलिंडरचा स्फोट (Latur Massive explosion) झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर सर्वोपचार रुग्णालयात साध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची पाहणी करत तपास सुरू केला. या (Latur Massive explosion) घटनेबाबत तात्काळ माहिती मिळाल्यानंतर सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, फॉरेन्सिक टीम, एटीएसची टीम तथा विविध तपास यंत्रणांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे", अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच या घटनेमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन केले आहे. लातूर पोलिसांकडून स्फोटामागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व शक्यतांचा तपास सुरू असून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उपलब्ध पुरावे आणि जळालेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचे फॉरेन्सिक ॲनालिसिसची पुढची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या स्फोटोमध्ये दोन इसम जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत", अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.

कार्टेजसमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज!
"प्राथमिक तपासानुसार, छत्रपती संभाजीनगर येथून एक कुरियर लातूरमध्ये आले होते, साधारणत: बंदूक घर म्हणून जे शॉप्स आहेत, तिथे एअर पिस्टल्स विक्रीसाठी ठेवले जातात. त्या एअर पिस्टलची कुरियरची ही डिलिव्हरी आहे, असे प्राथमिक तपासात दिसत आहे. त्या एअर पिस्टलसाठी आवश्यक असणारे कार्टेजस ज्यामध्ये सीओटू हा गॅस वापरला जातो. या कार्टेजसमुळे हा स्फोट झाला असावा, असे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. पण या एअर पिस्टलची संख्या किती होती, त्याच्यासोबत कार्टेजसची संख्या किती होती, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

कुरियर मधून स्फोटक पदार्थांना परवानगी कशी? 
छत्रपती संभाजीनगर येथून आलेले हे कुरिअर उमाटे कुरियरमध्ये उतरून घेण्यात आले होते. यात कार्टेजसमध्ये असलेल्या सीओटू गॅसमुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र कुरियर द्वारे अशा स्फोटक वस्तूंची ने-आण करता येते का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

टैग्स: Latur Massive explosion