Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

लग्नाचे आमिष अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी

Marriage Sexual Assault: पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी


लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून सोशल मीडियावर केली बदनामी 

Marriage Sexual Assault |

आखाडा बाळापूर (Marriage Sexual Assault) : येथील पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. यामुळे याबाबत सदर तरूणीने आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार दिली. झिरोने याबाबत गुन्हा दाखल करून घटनास्थळ धाराशिव जिल्ह्यात येत असल्याने त्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग केला असल्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी सांगितले.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणी सोबत एका गावातील तरूणाने जुलै २०२६ ते १० ऑगस्ट २०२६ धाराशिव येथील बसस्थानक समोर लॉजमध्ये (Marriage Sexual Assault) लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. नंतर सदर तरुणी सोबतचे विविध फोटो व्हॉटस् अ‍ॅप स्टेटस वर , फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून बदनामी केली. म्हणून त्या तरुणीच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी झिरोने गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन आनंद नगर जिल्हा धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग करण्यात आला.

Related to this topic: