Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शक्तिपीठ महामार्ग विरोध

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिंगी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी स्थगित

Shaktipeth Highway Protest: तालुक्यातील शिंगी व परिसरात शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोजणीला परिसरातील शेतकऱ्यांनी एकजुटीने ठाम विरोध केला. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध


शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिंगी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी स्थगित

Shaktipeth Highway Protest |

 

प्रशासनाची सामंजस्याची भूमिका; पंचनामा करून शेतकऱ्यांचा विरोध नोंदवला

वसमत (Shaktipeth Highway Protest) : तालुक्यातील शिंगी व परिसरात शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोजणीला परिसरातील शेतकऱ्यांनी एकजुटीने ठाम विरोध केला. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत आजची मोजणी स्थगित केली. यावेळी शेतकऱ्यांच्या विरोधाची अधिकृत नोंद घेत पंचनामा करण्यात आला. मोजणीच्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, शक्तिपीठ महामार्गामुळे शेतजमिनीवर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांच्या विरोधाची भूमिका प्रशासनासमोर स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने परिस्थिती सामंजस्याने हाताळत मोजणी पुढे न करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख चव्हाण, पिंटू क्षीरसागर, सरपंच चव्हाण  यांच्यासह शिंगी व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात (Shaktipeth Highway Protest) आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यातही शेतकऱ्यांची विरोधाची भूमिका नोंदविण्यात आली. शेतकऱ्यांची एकजूट आणि ठाम विरोधामुळे शिंगी येथील आजची मोजणी स्थगित झाल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षाला महत्त्वाचे यश मिळाले असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Related to this topic: