सेनगाव बस दुर्घटना

मद्यधुंद चालकाच्या ताब्यात मानव विकास बस; विद्यार्थिनींच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

Sengaon Bus Accident: विद्यार्थिनींच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दि. २७ जुलै सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला.

मद्यधुंद चालकाच्या ताब्यात मानव विकास बस; विद्यार्थिनींच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

Sengaon Bus Accident

 

दाताडा बुद्रुक येथे ग्रामस्थांनी बस अडवून चालकाला जाब

सेनगाव (Sengaon Bus Accident) : सेनगाव तालुक्यातील कोळसा–सेनगाव–सापडगाव–सुकळी–दाताडा बुद्रुक–दाताडा खुर्द–वटकळी मार्गावर धावणाऱ्या मानव विकास मिशनच्या विद्यार्थिनींच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दि. २७ जुलै सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला. विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींना घेऊन बस दाताडा मार्गे वटकळीच्या दिशेने जात असताना चालकाच्या संशयास्पद हालचाली विद्यार्थिनींच्या लक्षात आल्या. बस भरधाव आणि अस्थिर पद्धतीने चालवली जात असल्याचे जाणवताच विद्यार्थिनींनी प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबविण्याची मागणी केली.

ही माहिती मिळताच दाताडा बुद्रुक येथील नागरिकांनी बस अडवून चालकाला जाब विचारला. चालकाची तपासणी केली असता तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आणि संतप्त वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दुसरा चालक घटनास्थळी बोलावण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची काळजी घेत बस हिंगोली आगारात रवाना करण्यात आली.

या गंभीर प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ करणाऱ्या संबंधित चालकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिस्तभंगात्मक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच मानव विकास मिशनच्या बस चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी व मद्यपान चाचणी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा निष्काळजीपणाला कोणतीही माफी देता येणार नाही. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रा. अदितीताई पोहरेंना विजयी करा; युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांचे आवाहन

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रा. अदितीताई पोहरेंना विजयी करा; युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांचे आवाहन

मानोरा तालुक्यात प्रा. अदितीताई पोहरे यांच्या प्रचाराला वेग. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांनी केले.

Oct 17, 2026
राजीनामा द्या अन् मैदानात या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना निलंगेकरांचे आव्हान

राजीनामा द्या अन् मैदानात या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना निलंगेकरांचे आव्हान

लातूर बँक निवडणुकीवरून राजकीय वाद; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आव्हान. काँग्रेससोबत जायचे तर राजीनामा द्या, अशी मागणी.

Oct 17, 2026
पुण्यातील लोहगड हत्याप्रकरणात मोठी घडामोड; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील, 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल

पुण्यातील लोहगड हत्याप्रकरणात मोठी घडामोड; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील, 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक; पोलिसांकडून 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल.

Oct 17, 2026
नांदेडमध्ये घरफोडी आणि चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद; ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये घरफोडी आणि चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद; ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये घरफोडी आणि चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेने सात गुन्हे उघडकीस आणून ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Oct 17, 2026
‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर  बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

ठाण्यात ५ रुपयांच्या मुदतबाह्य बिस्किटावरून वाद. राघव दुबे यांच्या तक्रारीनंतर FDA ने रामायण जनरल स्टोअरवर कारवाई करत दुकानाला टाळे ठोकले.

Oct 17, 2026