वर्धा (MP Amar Kale) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षश्रेष्ठींनी अधिकृत भूमिका जाहीर करून कार्यकर्ते आणि जनतेतील संभ्रम दूर करावा, अशी मागणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी केली.दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देशोन्नतीशी संवाद साधताना ते बोलत होते.
खासदार काळे (MP Amar Kale) म्हणाले, "पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या विषयावर आमची कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. आमचे मतही जाणून घेण्यात आलेले नाही. पवार साहेबांनी खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांची मते घेतली असतील, तर काहींचे मत एनडीएसोबत जाण्याचे, तर काहींचे काँग्रेससोबत जाण्याचे असू शकते. मात्र, मला पक्षाच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा केवळ माध्यमांतूनच ऐकायला मिळाल्या."
ते (MP Amar Kale) पुढे म्हणाले, "आमच्या खासदारांच्या ग्रुपवरही या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षाच्या वर्धापनदिनालाही मी सर्वांसमोर माझी भूमिका मांडली होती. सध्या माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरू असून त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे."
"माझी आदरणीय शरद पवार साहेब तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की, पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एकदाच स्पष्ट भूमिका जाहीर करून ती सर्व कार्यकर्ते आणि जनतेसमोर मांडावी. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळेल," असेही खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांनी सांगितले.
विलीनीकरणावर पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट भूमिका घ्यावी: खासदार अमर काळे
MP Amar Kale: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षश्रेष्ठींनी अधिकृत भूमिका जाहीर करून कार्यकर्ते आणि जनतेतील संभ्रम दूर करावा: खासदार अमर काळे
MP Amar Kale
संबंधित सामग्री
‘माझ्यासाठी रडू नका...’ नाना पाटेकरांची शेवटची इच्छा
Veteran actor Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर निधन
दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ
Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू
Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!
CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!
Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.