Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी बस प्रवासी बेशुध्द

परभणीत धावत्या बसमधील प्रवासी बेशुध्द; चालकाने दाखविले प्रसंगावधान

Parbhani Bus Passenger:


परभणीत धावत्या बसमधील प्रवासी बेशुध्द चालकाने दाखविले प्रसंगावधान

Parbhani Bus Passenger |

 

वेळीच बस नेली थेट उपजिल्हा रुग्णालयात; परभणी-गंगाखेड बस मधील प्रकार

परभणी (Parbhani Bus Passenger) : गंगाखेड  येथे परभणीहून गंगाखेडकडे येणार्‍या धावत्या बसमध्ये प्रवास करणारा एक प्रवासी अचानक बेशुद्ध पडल्याची घटना मंगळवार २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात नेल्याने बेशुद्ध प्रवाशाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले आणि पुढील अनर्थ टळला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गंगाखेड आगाराची बस क्रमांक एमएच १४ एनई ७६९५ ही परभणी - गंगाखेड बस रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड शहरात दाखल झाली असता मागील आसनावर प्रवास करणारे भरत कैलासचंद्र शर्मा हे प्रवासी बेशुद्ध पडल्याचे सहप्रवासी आगस्ती हनुमान शिंदे व बस वाहक श्रीमती एस.बी. चव्हाण यांच्या निदर्शनास आले. प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती त्यांनी तातडीने बस चालक हरिचंद्र इंद्रजित देवकते यांना दिली.

तेंव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बस चालक देवकते यांनी प्रसंगावधान राखत बस बसस्थानकाकडे न नेता थेट गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात नेली. बेशुद्ध अवस्थेतील भरत शर्मा यांना तत्काळ उपचारासा'ी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी जाधव, परिचारिका पल्लवी माने, अश्विनी मुंडे आदींनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. (Parbhani Bus Passenger) बस चालक हरिचंद्र देवकते यांनी वेळ न दवडता बस थेट रुग्णालयात नेल्याने प्रवाशाला वेळीच उपचार मिळाले. त्यांच्या या प्रसंगावधानाचे बसमधील अन्य प्रवाशांनी कौतुक केले.