वसमत शहरातून निघणार प्रतीकात्मक अंत्ययात्रा
वसमत (Maratha Samaj Andolan) : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत वसमतमध्ये सकल मराठा समाजाची व्यापक बैठक घेण्यात आली यात राज्यातील २८८ आमदारांच्या निषेधार्थ प्रतीकात्मक ‘तिरडी आंदोलन’करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आंदोलनाची सूचना देणारे निवेदन तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Samaj Andolan) अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वसमत येथे सामाजिक कार्यकर्ते रवीकिरण वाघमारे यांनी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून, त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
या (Maratha Samaj Andolan) उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने व्यापक बैठक घेण्यात आली यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि समाजाच्या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३ सप्टेंबर रोजी वसमत शहरातून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार असून ती उपविभागीय कार्यालयासमोरील उपोषणस्थळी पोहोचेल. तेथे प्रतीकात्मक अंत्यविधी करून राज्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय ,तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाकडे आंदोलनाचे निवेदन देण्यात येत आहे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.