Parbhani Garbage Vehicle: थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन तसेच जीएसटी अनुदानाच्या फरकाची रक्कम द्यावी, या मागणीसाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिका कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचे एक वेतन,सेवानिवृत्तांचे एक वेतन केले जमा
परभणी (Parbhani Garbage Vehicle) : थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन तसेच जीएसटी अनुदानाच्या फरकाची रक्कम द्यावी, या मागणीसाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिका कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी आंदोलकांनी कचरा संकलनाच्या घंटागाड्या बंद केल्या. दरम्यान चतुर्थी श्रेणी कर्मचार्यांचे एक महिन्याचे आणि सेवानिवृत्तांची एक पेन्शन जमा करण्यात आली आहे.
शहर महापालिकेला जीएसटी अनुदान फरकाची ७२ कोटींची रक्कम द्यावी, कर्मचार्यांचे थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन अदा करावे, या मागणीसाठी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. भिकमांगो, मुंडण, पिंडदान, तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मनपा कर्मचार्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी आंदोलनकांनी कचरा संकलन करणार्या घंटागाड्या बंद केल्या. कर्मचार्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. कामबंद आंदोलनामुळे महापालिकेतील कामकाज ठप्प पडले आहे.