मानोरा रास्ता रोको आंदोलन

खापरदरी ते सावरगाव-कान्होबा रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा चिखलागड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

Manora Road Blockade Protest: तालुक्यातील खापरदरी ते सावरगाव - कान्होबा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सात दिवसाच्या आत प्रत्यक्ष सुरू करावे, अन्यथा ८ नोव्हेंबर रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन..

खापरदरी ते सावरगाव-कान्होबा रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा चिखलागड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

Manora Road Blockade Protest

 

गोर सेनेचा प्रशासनाला इशारा

मानोरा (Manora Road Blockade Protest) : तालुक्यातील खापरदरी ते सावरगाव - कान्होबा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सात दिवसाच्या आत प्रत्यक्ष सुरू करावे, अन्यथा ८ नोव्हेंबर रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गोर सेनेच्या वतीने तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दि. २ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, यापूर्वी दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी देखील याच मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. खापरदरी ते सावरगाव - कान्होबा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सात दिवसात सुरू करावे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करावी.

काम सुरू करण्यात कोणतीही तांत्रिक, प्रशासकीय अडचण असल्यास ती नागरिकांना लेखी स्वरूपात कळवावी. कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात.कामाचा निश्चित कालमर्यादा ठरवून कार्यवाही करावी. (Manora Road Blockade Protest) सदर रस्त्याच्या पुलासकट डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध आहे, ठेकेदाराने अनामत रक्कम भरली असून मोजमाप पुस्तिका आणि कार्यादेश (प्रशासकीय मान्यता) देखील निर्गमित झाला आहे. असे असतानाही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने या भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च होत असून, कानिफनाथ महाराजांच्या भक्तांची गैरसोय होत आहे,रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन जीवनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जर दि. ८ नोव्हेंबर रोजी, शनिवार पर्यंत कामाला सुरुवात झाली नाही तर सकाळी ११:३० वाजता चिखलवाड फाटा येथे लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन (Manora Road Blockade Protest) करण्यात येईल आणि यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी गोरसेना तालुकाध्यक्ष सुनील राठोड, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रवर्तक मनोहर राठोड, धर्मराज महाराज, रोशन चव्हाण, चेतन चव्हाण, गोकुळ आडे, रमेश जाधव, नारायण जाधव, संजय राठोड ,जगदीश राठोड, बाळू राठोड, रामजीवन राठोड आदी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वाशिम, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.