मानोरा घरकुल लाभार्थी

कोंडोली येथील  १८७ घरकुल लाभार्थ्यांची यादी रखडली!

Manora Housing Scheme Beneficiary: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे कोंडोली येथील बेघर व गरजू  १८७  घरकुल लाभार्थ्यांची यादी रखडली असून येत्या ७ दिवसात न्याय द्यावा, अन्यथा पंचायत समिती..

कोंडोली येथील  १८७ घरकुल लाभार्थ्यांची यादी रखडली!

Manora Housing Scheme Beneficiary

 

७ दिवसांत कारवाई नाही तर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा!

मानोरा (Manora Housing Scheme Beneficiary) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे कोंडोली येथील बेघर व गरजू  १८७  घरकुल लाभार्थ्यांची यादी रखडली असून येत्या ७ दिवसात न्याय द्यावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर तीव्र आंदोलन करून उपोषण करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन गट विकास अधिकारी यांना दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सामूहिक विनंती अर्जाद्वारे ग्रामस्थानी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अडीच महिन्यांपासून स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी मागणी करूनही, गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही लाभार्थ्यांची ही अंतिम यादी आणि आवश्यक तो प्रशासकीय ठराव आपल्या मानोरा पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही. स्वाभिमान पातळीवर केवळ 'आज पाठवतो, उद्या पाठवतो' अशी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे.

घरकुल (Manora Housing Scheme Beneficiary) ही आमच्या हक्काच्या निवाऱ्याची अत्यंत संवेदनशील बाब असून, स्थानिक दिरंगाईमुळे लाभ मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे आमचे घरकुल सुरक्षित राहून आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची मुख्य मागणी आहे, असे लाभार्थ्यांनी म्हटले आहे.  या प्रकरणाची सखोल चौकशी करून लाभार्थ्यांना अडकलेले घरकुल तात्काळ मंजूर करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करावी.

सदर अर्जाची दखल घेऊन प्रशासनाने पुढील ७ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही कारवाई न केल्यास, गावातील सर्व १८७ वंचित लाभार्थी कुटुंबासह लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषणास बसण्यास बाध्य होतील, याची कृपया नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.  या निवेदनावर  सतिश बोने , बेबी भवाळ, प्रकाश भवाळ, प्रियंका भवाळ, श्रावण  सिंगाडे, ज्ञानेश्वर भगवान हुडे, आदीसह इतर लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.