काशी पोहरादेवी संत नगरीत गोमातेचा जयघोष
जय सेवालाल, जय रामराव बापूच्या जयघोषाने दुमदुमली संतनगरी पोहरादेवी!
मानोरा (Manora Cow-Worship Grand Ceremony) : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दीपावलीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या शुभमुहूर्तावर भव्य व ऐतिहासिक गोदान आणि गोपूजन महासोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आद्य गोरक्षक संत सेवालाल महाराज यांच्या गोदान परंपरेला उजाळा देण्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शेकडो संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महासोहळ्याच्या (Manora Cow-Worship Grand Ceremony) प्रारंभी धर्मगुरु आमदार बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते वसुबारसच्या मुहूर्तावर गोमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संत रामराव महाराज मंदिरात महाआरती व अरदास करण्यात आली. यावेळी देवी बापू भक्त महंत शेखर महाराज यांनी भोग अर्पण केला. गोदान संवाद विचारपीठावर भागवत महर्षी संत मनीष भाईजी (भागवत धाम), आचार्य विष्णू महाराज (मध्य प्रदेश), विष्णू गिरी महाराज (महामंडलेश्वर), रामदास महाराज (गराशागड), अंकुशानंद महाराज (बासर), प्रेमचंद महाराज (वृंदावन धाम), बंडू महाराज दापेकर, जगदीश भारती, कैलास महाराज, शेखर महाराज पिंपळगाव, गोवर्धन राठोड आर्णी, पंकज महाराज, भाजप नेते देवीदास राठोड, मंगल नायक (उत्तर प्रदेश), रतन नायक (तेलंगणा), महंत सुनील महाराज, शेखर महाराज, संजय महाराज व भक्तराज महाराज राठोड यांच्यासह अनेक संत-महंतांची उपस्थिती होती.
यावेळी गोमातेच्या रक्षणासाठी Manora Cow-Worship Grand Ceremony उपस्थितांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. सनातन धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, गोमातेच्या ठायी देवतांचा वास असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे गोवंशाचे रक्षण, संगोपन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांच्यासह उपस्थित संत-महंतांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. गोसेवा आणि गोपालन ही काळाची गरज असून, या माध्यमातून धार्मिक परंपरा जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
यानंतर राज्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेला गोदानाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी कोळी, साई (इजारा) व तुळशीनगर येथील गोपालकांनी संगीताच्या तालावर गाईंना घोंगडीवर बसवून अनोखे प्रात्यक्षिक सादर केले. या आगळ्यावेगळ्या दृश्याने उपस्थित गोप्रेमींची मने जिंकली.
बंजारा संस्कृती आणि गोवंशाचे नाते अनादी काळापासून अटूट राहिले आहे. वसुबारसच्या पावन पर्वावर गोदानाचा संकल्प पूर्ण करून गोसेवा, गोसंवर्धन आणि गोरक्षणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे हा या महासोहळ्याचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भव्य महादीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गोमाता व भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण संतनगरी दुमदुमून गेली होती. या (Manora Cow-Worship Grand Ceremony) ऐतिहासिक सोहळ्याला सनातन हिंदू समाजबांधवांसह महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरण करून करण्यात आली.