आखाडा बाळापूर (Manoj Jarange Patil) : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात राज्याभरातून मराठा समाज सहभागी होत आहेत. सदर आंदोलनाला गावोगावी मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ ३ सप्टेंबर गुरूवारी कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला व सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी टायर जाळून घोषणाबाजी केली.
शासनाने तातडीने मराठा समाजाच्या न्याय मागण्या मंजूर करावेत अशी मागणी करून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्व समाज उभा आहे हे दाखवून देण्यात आले. गुरूवारी सकाळपासून बोल्डाफाटा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. बोल्डाफाटा परिसरातील सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होता.
महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा बाबतीत सगळ्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी सकल मराठा समाज वतीने करण्यात आली आहे.