मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात कुरुंदा मार्केट कडकडीत बंद 

Manoj Jarange Patil: सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनात मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात कुरुंदा मार्केट कडकडीत बंद 

Manoj Jarange Patil

कुरुंदा (Manoj Jarange Patil) : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनात मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.यांच्या समर्थनात कुरुंदा मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आले 

सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरुंदा येथील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाला १०० टक्के पाठिंबा दर्शविला आहे. मुख्य बाजारपेठ, कॉम्प्लेक्स मधील सर्व दुकानांचे शटर सकाळ पासूनच बंद असल्याने मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता.

बंद नंतर कुरुंदा येथून वसमतकडे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. ट्रॅक्टरवर भगवे झेंडे लावून निघालेल्या या मोर्चात संपूर्ण रस्ताभर एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचेअशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

 वसमत मध्ये पोहोचल्यानंतर शहरातील सत्यनारायण टाकी येथून २८८ आमदारांची प्रतीकात्मक पिंड यात्रा काढण्यात आली. तहसील कार्यालय परिसरात (Manoj Jarange Patil) सकल मराठा समाजाच्या वतीने २८८ आमदारांचा प्रतीकात्मक अंत्यविधी व पिंडदान करण्यात आले   मराठा आरक्षणावर गप्प बसल्याच्या 288 आमदारांचा  निषेधार्थ हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी     कुरुंदा येथील सकल  मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

टैग्स: Manoj Jarange Patil

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026
मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ९० दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

Sep 17, 2026
मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शिंदे समिती आणि आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असताना शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नव्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय.

Sep 16, 2026
‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

‘१२ मागण्या मान्य केल्या तर त्या सार्वजनिक का करत नाही?’; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा आहे. या १२ मागण्या तातडीने सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Sep 16, 2026