Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

मनोज जरांगे पाटील आंदोलन

परभणीत जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पाथरीत रास्ता रोको; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Manoj Jarange Patil Andolan:


परभणीत जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पाथरीत रास्ता रोको महामार्गावर वाहनांच्या रांगा 

Manoj Jarange Patil Andolan |

 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

पाथरी (Manoj Jarange Patil Andolan) : तालुक्या अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी पाथरी शहरात बुधवार २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० . वा .रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले.

पाथरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी (Manoj Jarange Patil Andolan) सकाळी साडेदहा वाजता  रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाने संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र व त्यास वैधता देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील प्रलंबित व्याज परतावे अदा करणे तसेच पंजाबराव देशमुख विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना तातडीने देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.

रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Manoj Jarange Patil Andolan) आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते ही सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलकांकडून पोलिसांना मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले .यामध्ये उद्या पाथरी शहर बंद असल्याचे म्हटले आहे.