साखर कारखानदारी मांजरा पॅटर्न

हार्वेस्टरने ऊस तोडणीतून पशुधनासाठी मिळणार वाढे! 

Sugar Industry Manjara Pattern: गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रथमच मांजरा परिवाराने ऊस तोडणी कार्यक्रम राबवताना हार्वेस्टरला टॉपर लावून उसाचे वाढे वेगळे काढण्याचा उपक्रम सुरू...

हार्वेस्टरने ऊस तोडणीतून पशुधनासाठी मिळणार वाढे! 

Sugar Industry Manjara Pattern

 

साखर कारखानदारीत 'मांजरा पॅटर्न' पुन्हा एकदा पथदर्शी!

लातूर (Sugar Industry Manjara Pattern) : गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रथमच मांजरा परिवाराने ऊस तोडणी कार्यक्रम राबवताना हार्वेस्टरला टॉपर लावून उसाचे वाढे वेगळे काढण्याचा उपक्रम सुरू केल्याने पशुपालकांमध्ये तसेच ऊस उत्पादकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ऐन दुष्काळात पशुधनासाठी चारा वाचविण्याच्या या उपक्रमाचा मांजरा पॅटर्न इतर कारखान्यांसाठी पुन्हा एकदा या उपक्रमामुळे पथदर्शी ठरला आहे.

दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा उसापासून चारा घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा होता. पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी हार्वेस्टर ऐवजी ऊस तोडणी कामगारा मार्फत ऊस तोडणी करावी, अशी मागणीही एकीकडे केली जात होती. मात्र कामगारांची टंचाई लक्षात घेता हार्वेस्टरने ऊस तोडणी यंत्रणा सर्वत्र राबविले जात असल्याने या हार्वेस्टरलाच टॉपर लावून उसाचे वाढे अगोदर एकीकडे काढून हार्वेस्टरने ऊस तोडणी होत आहे.

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली (Sugar Industry Manjara Pattern) मांजरा परिवारातील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना यासह परिवारातील इतर सर्व कारखान्यांमध्ये हार्वेस्टर ने ऊस तोडणी प्रोग्राम रावीला जात आहे. आता या हार्वेस्टरला टॉपर लावून उसाचे वाढे वेगळे काढून ऊस उत्पादक व पशुपालकांना दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा देण्याचे काम मांजरा परिवाराने केले आहे. 

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रातील औसा तालुक्यातील काही गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणी करत असताना, टॉपरच्या सहाय्याने उसाचे वाढे बाजूला काढून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध होणार आहे.

शेतकरी पशुपालकांसाठी फायद्याची गोष्ट...
हार्वेस्टर ने ऊसतोड झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतात खोडकी कटरची मेहनत वाचते. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी ३ हजार रुपये खर्चावे लागत होते. शिवाय फडावरच उसाचे पाचट जाळले जात असल्याने जमिनीचा पोत घसारा होत असे. मात्र आत्ता हार्वेस्टर मुळे पाचटीची भुकटी शेतात पडत असल्याने मोठ्या प्रमाणात खत निर्माण होऊन जमिनीचा पोत वाढत आहे. मांजरा परिवाराने नेहमी शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे, असे रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील यांनी दैनिक 'देशोन्नती'शी बोलताना सांगितले.

संबंधित सामग्री

ऊस कडू झाला, साखर गोड झाली; ऊस उत्पादक शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल?

ऊस कडू झाला, साखर गोड झाली; ऊस उत्पादक शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल?

उत्पादनावर प्रक्रिया करून होणाऱ्या साखरेपासून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

Aug 29, 2026
साखरेच्या दरात विक्रमी उसळी; ७,५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव, राजू शेट्टींनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

साखरेच्या दरात विक्रमी उसळी; ७,५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव, राजू शेट्टींनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

राज्यात साखरेच्या दराने अचानक मोठी झेप घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे.

Aug 21, 2026