Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

विद्यार्थी बस अपघात

नांदगव्हाण-बोरवा येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस घुसली शेतात

Student Bus Accident:


नांदगव्हाण-बोरवा येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस घुसली शेतात

Student Bus Accident |

मानोरा (Student Bus Accident) : नांदगव्हाण व बोरवा येथील विद्यार्थ्यांना घेऊन बस मानोरा येथे येत असताना बोरवा येथील घाटात अचानक बस न्यूट्रल झाल्याने रिव्हर्समध्ये जाऊन शेतात घुसली. बसमध्ये अंदाजे ४० ते ४५ विद्यार्थी मुले-मुली प्रवास करत होते. (Student Bus Accident) घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. घाटातील उतारावर बस अचानक मागे गेल्याने चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन थांबली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसची तांत्रिक स्थिती आणि देखभाल योग्य पद्धतीने केली होती का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. (Student Bus Accident) घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याने पालकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Related to this topic: