हिंगोली (MLA Santosh Bangar) : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवीच्या चरणी राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून सावरण्यासाठी साकडे घातले.
आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) व त्यांच्या सुमित्य पत्नी सौ गोदावरी ताई बांगर यांनी यांनी बुधवारी माहूर येथे जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या गाभाऱ्यात आरती करून राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांचे पीक चांगले येऊ दे आणि बळीराजाला या संकटातून बाहेर काढ, अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना आमदार बांगर (MLA Santosh Bangar) म्हणाले की , माझा शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे. पेरण्या झाल्या पण पाऊस नाही, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मी आज रेणुका मातेकडे एकच मागणे मागितले आहे की, माझ्या राज्यातील शेतकऱ्यांवर कृपा कर आणि त्याला या दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढ. सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोतच, पण देवीचा आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा आहे.
दरम्यान, माहूर दर्शनासाठी जात असताना पुसद येथे शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. देवी दर्शनानंतर आमदार बांगर यांनी गडावरील पुजाऱ्यांकडून तीर्थप्रसाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.