Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पोहरादेवी नगारा म्युझियम

पोहरादेवी येथील नगारा म्युझियमच्या १ किमी परिसरात आंदोलन, उपोषणास बंदीची मागणी!

Pohradevi Nagara Museum: मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील म्युझियम व परिसरातील १ किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, उपोषण, अवैध जमाव करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी


पोहरादेवी येथील नगारा म्युझियमच्या १ किमी परिसरात आंदोलन उपोषणास बंदीची मागणी  

Pohradevi Nagara Museum |

 

सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन!

मानोरा (Pohradevi Nagara Museum) : जगप्रसिद्ध नंगारा  म्युझियम बंजारा विरासत भवन हे राष्ट्रीय स्मारक असून येथील पावित्र्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील म्युझियम व परिसरातील १ किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, उपोषण, अवैध जमाव करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  वाईगौळ ग्रा. प. चे  प्रशासक सरपंच उमेश पांडुरंग राठोड, मोंटी राठोड महाराज व ध्रुव राठोड यांनी उपविभागीय अधिकारी, कारंजा (महसूल) यांचेकडे दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन सादर करत केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, नंगारा म्युझियम विरासत (Pohradevi Nagara Museum) हे राष्ट्रीय स्मारक आहे. येथे देशभरातून दररोज शेकडो व सण उत्सवात हजारो - लाखो पर्यटक, भाविक भक्त दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा जमाव केल्यास गैरकृत्य होऊ शकते.  राजकीय आंदोलनामुळे येणाऱ्या पर्यटकांवर, वृद्ध माता - भगिनींवर, गरोदर महिलांवर व लहान मुलांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. भविष्यात एखादे आंदोलन तीव्र झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच नंगारा म्युझियम विरासत (Pohradevi Nagara Museum) मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे राजकीय आंदोलन, उपोषण, निदर्शने किंवा अवैध जमाव करणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडल्यास शासनाची जबाबदारी असेल. म्हणून बंजारा म्युझियमच्या १ किलोमीटर परिसरात कलम १४४ लागू करून सदर क्षेत्र कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.