Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

महाविकास आघाडी एल्गार

कर्जमाफी, पीकविमा, घरकुल अन् स्मार्ट मीटरविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

MahaVikas Aghadi Elgar: फसवी कर्जमाफी बंद करून नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, महागाईच्या भस्मासुराने सर्वसामान्यांना गिलकृत करून टाकले तरी जीवनावश्यक वस्तूंवरील दर कमी..


कर्जमाफी पीकविमा घरकुल अन् स्मार्ट मीटरविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

MahaVikas Aghadi Elgar |

 

मानोरा येथे महाविकास आघाडीची बैठक उत्साहात

मानोरा (MahaVikas Aghadi Elgar) : शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात ज्वलंत प्रश्नांवर  दि. २५ ऑगस्ट रोजी शासकीय विश्राम गृह येथे महाविकास आघाडीची बैठक माजी आ. अनंतकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी सर्वसामान्य जनता ,कष्टकरी शेतकरी यांना भेडसावणाऱ्या व त्यांना त्यापासून होणाऱ्या त्रासाबद्दल मार्ग काढण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी येत्या ९ सप्टेंबर रोजी मानोरा तालुका ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. 
     
आयोजित मोर्चात फसवी कर्जमाफी बंद करून नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, (MahaVikas Aghadi Elgar) महागाईच्या भस्मासुराने सर्वसामान्यांना गिलकृत करून टाकले तरी जीवनावश्यक वस्तूंवरील दर कमी करणे व इतर धान्यप्रमाणे साखर, तेल रेशन दुकानातून वितरण करणे, शैक्षणिक धोरणात सुधारणा करून पेपरफुटी प्रकरण तसेच गोर गरीबांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, बेरोजगाराला रोजगार देऊन हाताला काम पोटाला भाकर मिळावी यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे, स्मार्ट मीटर बसविणे बंद करून त्यासाठी कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये, खचलेल्या व सिंचन विहीर बांधकामाचे देयके ताबडतोब देण्यात यावे, घरकुल बांधकामाचे थकलेले हप्ते ताबडतोब देऊन वंचित राहिलेल्याना नवीन घरकुल देण्यात यावे.

अतिक्रमण नियमाकुल करून ८- अ देण्यात यावे, जंगली जनावराकडून होत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई व हल्ल्यात जखमी झालेल्यांना ताबडतोब अर्थसहाय्य देण्यात यावे व शेतकऱ्यांना तारकुंपणासाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, पांदण रस्ते खुले करून ते ताबडतोब सुरू करावे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्या अथवा भत्ता तात्काळ द्यावे, मागील वर्षापासून प्रलंबित असलेला पिक विमा ताबडतोब देण्यात यावे, बंद केलेली आदिवासी समाजाची खावटी सुरू करण्यात यावी आदी मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. 

या (MahaVikas Aghadi Elgar) बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पवार, बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष काशीराम राठोड, माजी प. स. सदस्य विजय पाटील, महंत रमेश महाराज, शेतकरी नेता डॉ विठ्ठल घाडगे, ओबीसी सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अशोक करसडे, मुकुंद आडे, माणिक राठोड,  विठ्ठल शिंदे, वसंतराव भगत, अलताब बेग, सुभाष जोंधळेकर, देवा कुऱ्हाडे, मअविनाश गोदमले, सोव्हिल टिपरे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Related to this topic: