बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील मासरुळ येथे १० ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच शकुंतलाबाई महाले होत्या. सुरुवातीला गावातील विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय चर्चेला आला.
गावात एकूण तीन गट तयार झाले होते. या तिन्ही गटांकडून प्रत्येकी एक उमेदवार अध्यक्षपदासाठी दावेदार म्हणून रिंगणात उतरला होता. ग्रामसभेला शेकडो नागरिक उपस्थित होते. मात्र, उपस्थित नागरिकांना विश्वासात न घेता उमेदवारांच्या नावांबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामसभेत गोंधळ उडाला. सुरुवातीला समोर आलेले उमेदवार बाजूला पडून वेगळ्याच व्यक्तीचे नाव पुढे आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तिन्ही गट आमनेसामने आले असताना या वादात भाजप गटाकडून समाधान शिंदे यांचे नाव घोषित करण्यात आले.
समाधान शिंदे यांच्या नावाला सर्वानुमते दुजोरा
समाधान तुकाराम शिंदे हे परिसरात कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा मुलगा सैन्यदलात, तर मुलगी पोलीस दलात कार्यरत आहे. तसेच, ते गावासाठी पूर्णवेळ देऊ शकतील, या कारणांमुळे त्यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही. अखेर सर्वानुमते समाधान तुकाराम शिंदे यांची मासरुळ येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली.
निवडीनंतर गावातून ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात आली. समितीमध्ये काही नागरिकांना पदोन्नतीही मिळाली.
तंटामुक्त समितीचे नवनियुक्त पदाधिकारी
-
अध्यक्ष : समाधान तुकाराम शिंदे
-
उपाध्यक्ष : अशोक पाटील
-
सचिव : गजानन बोडखे
-
सहसचिव : अर्जुन लांडे
-
कोषाध्यक्ष : रामेश्वर सिनकर
ग्रामसभेला मान्यवरांची उपस्थिती
या ग्रामसभेला शेषराव सावळे, जगन्नाथ उंबरकर, हरिभाऊ रामदास सिनकर, ग्रामविकास अधिकारी दहिभाते मॅडम, मधुकर सिनकर, समाधान सिनकर, अर्जुन लांडे, गजानन बोडखे, रामेश्वर सिनकर, प्रकाश लांडे, संजय देशमुख, शरद देशमुख, संभाजी देशमुख, संदीप देशमुख, गणेश नरवाडे, मधुकर महाले, बाळू सपकाळ, रामेश्वर आल्हाट, कौतिक गुळवे, समाधान फुसे, रमेश कोथलकर, गजानन लांडे, पांडुरंग गुळवे, ज्ञानेश्वर पवार तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर उपस्थित होते.
सदर ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात पार पडली. यावेळी बीट जमादार रवींद्र चव्हाण व त्यांचे सहकारी, शेकडो नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.