Maharashtra Taxi Policy

टॅक्सी प्रवासाचे वाटप आता अधिक पारदर्शक होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

महाराष्ट्रात स्वतंत्र टॅक्सी चालकांसाठी समान संधी देणारा प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; ओला-उबरच्या प्रवास वाटपात पारदर्शकतेवर भर.

टॅक्सी प्रवासाचे वाटप आता अधिक पारदर्शक होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

ओला-उबरसारख्या अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यावर भर; चालकांचे उत्पन्न, सामाजिक सुरक्षा आणि तांत्रिक प्रणालींच्या लेखापरीक्षणाबाबतही महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : ओला, उबरसारख्या अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवांच्या वाढत्या विस्तारात स्वतंत्र टॅक्सी चालकांना समान व्यावसायिक संधी मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारने तंत्रज्ञानाधारित स्वतंत्र प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर दिला आहे. प्रवासाचे वाटप, उत्पन्नाच्या संधी आणि चालकांवरील कारवाई या प्रक्रियांमध्ये पारदर्शकता राखून सर्वांना समान वागणूक मिळावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र मोटार व्हेईकल अ‍ॅग्रीगेटर रुल्स, २०२६ अंतर्गत समुच्चय वाहन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सविस्तर सादरीकरण केले. यावेळी स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण, मोठ्या फ्लीट ऑपरेटरशी स्पर्धा करताना येणाऱ्या अडचणी आणि प्रवास मिळवण्यातील असमानता यांसारखे मुद्दे मांडण्यात आले.

राज्यात ओला, उबर आणि इतर अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक व्यवसाय विस्तारत आहे. मात्र, स्वतंत्र चालकांना पुरेशा फेऱ्या मिळवणे, उत्पन्न टिकवणे आणि मोठ्या वाहन ताफ्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण जात असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देणारी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

प्रवास वाटपातील अल्गोरिदमची कार्यपद्धती स्पष्ट होणार?

अ‍ॅपवरून चालकांना प्रवास देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्गोरिदमची कार्यपद्धती स्पष्ट नसल्याची तक्रार स्वतंत्र टॅक्सी चालकांकडून केली जाते. विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून मिळणाऱ्या अधिक उत्पन्नाच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या चालकांना प्राधान्य मिळते, तर स्वतंत्र चालकांच्या वाट्याला तुलनेने कमी उत्पन्नाच्या फेऱ्या येतात, अशी भावना व्यक्त होत आहे.

या परिस्थितीत प्रवासाचे वाटप कोणत्या निकषांवर केले जाते, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. कोणत्याही चालकावर अन्याय होऊ नये आणि सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता सादरीकरणातून मांडण्यात आली.

स्वतंत्र चालक आणि फ्लीट ऑपरेटरना समान निकष

स्वतंत्र चालकांच्या किरकोळ चुकांवर त्यांची खाती बंद करणे किंवा निलंबनाची कारवाई करणे, अशा तक्रारीही समोर आल्या आहेत. मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या बाबतीतही याच निकषांनुसार कारवाई केली जाते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

एव्हरेस्ट फ्लीट्स, मूव्ह फ्लीट आणि कॅर्रम फ्लीट यांसारख्या मोठ्या वाहन ताफ्यांच्या ऑपरेटरना कथितरीत्या मिळणाऱ्या प्राधान्याचा स्वतंत्र चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. त्यामुळे सर्व चालक आणि कंपन्यांसाठी समान नियम, स्पष्ट निकष आणि निष्पक्ष कारवाईची पद्धत असावी, यावर भर देण्यात आला.

चालकांचे उत्पन्न आणि सामाजिक सुरक्षेला महत्त्व

टॅक्सी चालकांना मिळणारे भाडे, प्रोत्साहनपर रक्कम आणि कामगिरीचे मूल्यांकन या बाबींची प्रक्रिया पारदर्शक असावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच चालकांचे उत्पन्न, कामाचे तास, विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) यांसारख्या सामाजिक सुरक्षा सुविधांबाबतही स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे मांडण्यात आले.

प्रवास वाटपासाठी वापरल्या जाणाऱ्या जिओ-फेन्सिंग, लाइव्ह जिओ-लोकेशन आणि वाढीव भाडे निश्चिती यांसारख्या तांत्रिक प्रणालींचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या यंत्रणांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवून त्यांचा वापर सर्व चालकांच्या हितासाठी होतो की नाही, याची खातरजमा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

स्वतंत्र तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर

समुच्चय वाहन धोरणाचा उद्देश केवळ अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीचे नियमन करणे एवढाच नसून, स्वतंत्र टॅक्सी चालकांसह या क्षेत्रातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यासाठी मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आणि चालकांमधील भेदभाव टाळणारी, प्रवास वाटपात पारदर्शकता राखणारी तंत्रज्ञानाधारित व्यवस्था उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

या व्यवस्थेमुळे स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या रोजगाराला संरक्षण मिळणे, स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायाच्या समान संधी उपलब्ध होणे आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रात न्याय्य स्पर्धा निर्माण होणे अपेक्षित आहे. तसेच प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी सेवा मिळावी, यासाठी समुच्चय वाहन धोरणाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर राज्य सरकारचा भर राहणार आहे.

संबंधित सामग्री

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय घडामोडींचे संकेत! विलिनीकरण आणि ऑपरेशन टायगरवर संजय शिरसाटांचे मोठे विधान.

Nov 16, 2026
पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चांना वेग.

Nov 16, 2026
पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चांना वेग.

Nov 16, 2026
'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026
मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? ५०० कोटींच्या क्लिपनंतर फडणवीस-शिंदेंबाबत मोठे संकेत; SIT चौकशीची मागणी.

Nov 14, 2026