Maharashtra Pollution Control Board

पुण्यात MPCB च्या सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; आर्थिक व्यवहारांचे प्रकरण चर्चेत

पुणे MPCB मधील सहा अधिकारी निलंबित. उद्योगांच्या CTE-CTO परवानग्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश.

पुण्यात MPCB च्या सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई;  आर्थिक व्यवहारांचे प्रकरण चर्चेत

Maharashtra Pollution Control Board

उद्योगांना CTE आणि CTO परवाने देताना आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप; व्हिडिओ पुरावे आणि असमाधानकारक खुलाशांनंतर विभागीय चौकशीचे आदेश

पुणे : उद्योगांना परवानग्या देण्याच्या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत मंडळाने सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीही केली जाणार आहे.

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये कारवाया सुरू असतानाच प्रदूषण नियंत्रण मंडळातील या घडामोडीमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे, क्षेत्रीय अधिकारी सुषमा कुंभार, क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके आणि क्षेत्रीय अधिकारी अजय खामकर यांचा समावेश आहे.

उद्योग सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली संमती (Consent to Establish - CTE) आणि उद्योगाच्या संचालनासाठी दिली जाणारी संमती (Consent to Operate - CTO) मंजूर करण्याच्या प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. उद्योगांना परवानग्या देण्याच्या मोबदल्यात कथित आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींसोबत व्हिडिओ स्वरूपातील पुरावेही सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून या प्रकरणात खुलासे मागवण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे नमूद करत सक्षम प्राधिकाऱ्यांनी ते अमान्य केले. त्यानंतर संबंधित सहा अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.

या निलंबनाची कारवाई विभागीय चौकशीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. दरम्यान, निलंबनाच्या कालावधीत या अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. तसेच, नियंत्रण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्योगांना पर्यावरणविषयक परवानग्या देण्याच्या प्रक्रियेत झाल्याचा आरोप असलेल्या या कथित आर्थिक व्यवहारांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता विभागीय चौकशीतून या प्रकरणातील आरोपांबाबत पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

संबंधित सामग्री

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

National Sports Awards: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

Nov 13, 2026
अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार? चेअरमन राजेश पाटील यांचे संकेत; शनिवारी नव्या दरांबाबत निर्णय होण्याची शक्यता.

Nov 13, 2026
नागपूर महापालिकेत ACB चा छापा! जमाबंदी रेकॉर्डसाठी १ हजारांची लाच घेताना टॅक्स कलेक्टर रंगेहात पकडला

नागपूर महापालिकेत ACB चा छापा! जमाबंदी रेकॉर्डसाठी १ हजारांची लाच घेताना टॅक्स कलेक्टर रंगेहात पकडला

नागपूर महापालिकेचा टॅक्स कलेक्टर गौरव वानखेडे याला जमाबंदी रेकॉर्डच्या माहितीसाठी १ हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.

Nov 13, 2026
महाराष्ट्राच्या ईराची जागतिक भरारी! 10व्या वर्षी केले सहा विश्वविक्रम

महाराष्ट्राच्या ईराची जागतिक भरारी! 10व्या वर्षी केले सहा विश्वविक्रम

Ira’s Global Ascent: महाराष्ट्रातील बुलढाणा येथील अवघ्या 10 वर्षीय ईरा आदित्य राऊत हिने स्कूबा डायव्हिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एका दिवसात सहा जागतिक विक्रम नोंदवले आहेत.

Nov 12, 2026
अजितदादांशिवायची पहिली दिवाळी अन् भाऊबीज; सुप्रिया सुळे भावुक, शेअर केला जुन्या आठवणींचा व्हिडीओ

अजितदादांशिवायची पहिली दिवाळी अन् भाऊबीज; सुप्रिया सुळे भावुक, शेअर केला जुन्या आठवणींचा व्हिडीओ

पवार कुटुंबावर यंदा दिवाळीत दुःखाचे सावट; भावाच्या आठवणींना उजाळा देत सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Nov 11, 2026