वाशिम (Washim District BJP) : वाशिम जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर दीर्घकाळ मजबूत पकड असणारे शिवसेने उबाठाचे ज्येष्ठ नेते तथा मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी अखेर आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. या मोठ्या घडामोडीमुळे वाशिम जिल्ह्यातील आगामी निवडणुकांचे संपूर्ण राजकीय समीकरण आता बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात २३ मे रोजी ३० ते ३२ वाहनांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. या (Washim District BJP) ताफ्यात जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे माजी सदस्य यांच्यासह ग्रामीण भागातील २०० हून अधिक प्रमुख आणि क्रियाशील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मापारी यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत वाशिममधील शिवसेनेचे काही शहर प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी आणि इतर अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
आपल्या आक्रमक आणि डावपेचात्मक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सुरेश मापारी यांचा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत दांडगा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सर्वच स्तरांवरील निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षीय पातळीवरील वाढती अस्वस्थता आणि कार्यकर्त्यांकडून भाजपमध्ये जाण्यासाठी होत असलेला सातत्यपूर्ण आग्रह, यांमुळेच त्यांनी हा मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.
या (Washim District BJP) भव्य पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनशक्ती कमालीची वाढली असून पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट प्रभाव असणाऱ्या खमक्या कार्यकर्त्यांची मोठी फळीच मापारी यांच्यासोबत भाजपमध्ये आल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे भाजपची स्थिती अत्यंत भक्कम झाली असून, ही घडामोड जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मापारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून जिल्ह्यात भाजपचा विजयरथ अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.
वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठाला मोठे खिंडार; सुरेश मापारींचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!
Washim District BJP: वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठलेल्या जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Washim District BJP
संबंधित सामग्री
‘सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार’; संजय राऊतांचा मोठा दावा
सीजेपीच्या दिल्ली आंदोलनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. मोदी सरकार सहा महिन्यांत कोसळेल, असा दावा करत त्यांनी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरच? ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे संकेत. ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा गटाची मोठी कारवाई! पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची अजित पवार गटातून हकालपट्टी. बारामतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण.
संजय राऊतांचा मोठा आरोप! ‘फडणवीस, शिंदे आणि ज्ञानेश कुमार यांच्या त्रिकुटाने शिवसेनेचा पराभव घडवला’
संजय राऊतांचा फडणवीस, शिंदे आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप. २०२४ च्या निवडणुकीवर भाष्य करत दिल्लीतील आंदोलनासाठी तुरुंगात जाण्याची तयारीही दर्शवली.
राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळला! मुख्यमंत्र्यांशी चर्चा; नोकऱ्यांबाबत मोठी बातमी येण्याची अपेक्षा
MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. येत्या काही दिवसांत चांगली बातमी येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.