Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलिस कर्मचारी मृत्यू

हिवरा शिवारात अपघातात कर्तव्यावरील पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

Police Officer Death:


हिवरा शिवारात अपघातात कर्तव्यावरील पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

Police Officer Death |

हिंगोली (Police Officer Death) : बासंबा ठाण्यातील पोलिस कर्मचारी मुरलीधर देवबा जाधव हे औंढा नागनाथ येथून बासंबा ठाण्याकडे कर्तव्यावर जात असताना हिवरा शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ येथे श्रावण मास निमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी अनेक ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. ३१ ऑगस्ट ला तिसर्‍या सोमवार निमित्त रविवारीच बंदोबस्त मागविण्यात आला होता. बासंबा ठाण्यातील मुरलीधर जाधव (५०) यांचाही समावेश होता. बासंबा पोलिस ठाणे हद्दित रविवारी रात्री खुनाची घटना व आरोपीने विषारी औषध पिल्याने बासंबा ठाण्याचा बंदोबस्त औंढा ना. येथून पाठविण्यात आला होता. मुरलीधर देवबा जाधव हे मोटार सायकलवरून मध्यरात्री निघाले होते.

औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर हिवरा शिवारात मोटर सायकलची ट्रकला धडक झाली. यामध्ये मुरलीधर जाधव हे जमिनीवर कोसळले. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. औंढा नागनाथ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयात जाधव यांना नेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. 

३१ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिव देहास पोलिस प्रशासनाकडून शोक सलामी देण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घटनेबाबत सोमवारी सायंकाळ पर्यंत नोंद झाली नव्हती.

Related to this topic: