आमदार श्वेता महाले पाटील

शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार नाही ; आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराला यश

MLA Shweta Mahale Patil: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता (OTS) पद्धतीने कर्जाची परतफेड..

शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार नाही ; आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराला यश

MLA Shweta Mahale Patil

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाययोजनांचे दिले निर्देश

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता (OTS) पद्धतीने कर्जाची परतफेड करताना त्यांचा सिबिल (CIBIL) स्कोर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, या गंभीर प्रश्नाकडे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

आमदार महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, सरकारने दिलेली शेतकरी कर्जमाफी ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना आहे. मात्र, दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना OTS अंतर्गत लाभ घेताना त्यांच्या सिबिल स्कोरवर विपरीत परिणाम झाल्यास भविष्यात पीक कर्ज, शेती विकासासाठीचे कर्ज तसेच इतर बँकिंग सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत असून या संदर्भात शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड OTS ऐवजी नियमित कर्ज परतफेड पद्धतीने करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा किंवा कर्जमुक्तीचा लाभ घेताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर कमी होणार नाही, यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

या निवेदनाची मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित सहकार विभागाच्या सचिवांना या विषयाचा तातडीने अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचे उपाय सुचविण्याचे निर्देश दिले  आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून, भविष्यात त्यांना कर्जपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या या पुढाकारामुळे केवळ चिखली विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक भविष्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू करण्यास त्यांनी केलेला प्रयत्न राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे...

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात आजपासून १० टक्के पाणीकपात; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे जलनियोजन

महाराष्ट्रात आजपासून १० टक्के पाणीकपात; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे जलनियोजन

महाराष्ट्रात आजपासून १० टक्के पाणीकपात लागू. धरणांमध्ये ७२ टक्के जलसाठा असून, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Oct 16, 2026
माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीत कथित गैरप्रकाराचा सुषमा अंधारेंचा आरोप. नागपूरच्या एका केंद्रावरील २४ उमेदवार मेरिटमध्ये; चौकशी आणि फेरपरीक्षेची मागणी.

Oct 15, 2026
दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये..

Oct 14, 2026
बावनकुळेंनी सांगितले मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय; शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी

बावनकुळेंनी सांगितले मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय; शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी, चारा व्यवस्था आणि ओबीसी मागण्यांवर चर्चा.

Oct 14, 2026
अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट मिळणार. २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; ४२.८१ कोटींचा निधी.

Oct 14, 2026