Maharashtra Legislative Council Election

महायुतीच्या पराभवाचे खापर शिंदेसेनेवर? रविंद्र चव्हाण घेणार पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये. रविंद्र चव्हाण पुणे-नागपूरचा आढावा घेणार; शिंदेसेनेच्या भूमिकेवरून महायुतीत तणाव वाढल्याची चर्चा.

महायुतीच्या पराभवाचे खापर शिंदेसेनेवर? रविंद्र चव्हाण घेणार पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

Maharashtra Legislative Council Election

महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागांवर विजय; शिंदेसेनेवर भाजपची नाराजी, रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पाचही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या महायुतीला प्रत्यक्षात केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला, तर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. या निकालानंतर भाजपकडून शिंदेसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हालचाली सुरू केल्या असून, नागपूर आणि पुण्यातील संघटनात्मक कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. काही पदाधिकारी आणि मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पुणे आणि नागपूरमधील पराभवाचा भाजप घेणार आढावा

विधान परिषद निवडणुकीतील निकालांचे विश्लेषण करण्यासाठी रविंद्र चव्हाण जिल्हानिहाय आढावा घेणार आहेत. पुणे आणि नागपूरमधील निवडणूक व्यवस्थापन, जिल्हाध्यक्षांची कामगिरी तसेच आमदार आणि मंत्र्यांची भूमिका तपासली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी महायुतीला अपेक्षित यश का मिळाले नाही, याची कारणे शोधून त्यासंदर्भातील अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीत अपेक्षित सहकार्य न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. काही पदाधिकारी आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपमधील आगामी संघटनात्मक निर्णयांकडे लक्ष लागले आहे.

रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबर रोजी दिल्ली दौरा करणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशीही त्यांची भेट होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील मित्रपक्षांनी निवडणुकीदरम्यान घेतलेल्या भूमिकेचा तपशील आणि पराभवाची कारणे याबाबतचा अहवाल अमित शाह व नितीन नबीन यांच्यासमोर मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या या हालचालींमुळे महायुतीतील संबंधांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या काळात राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवनाथ बन यांचा शिंदेसेनेवर निशाणा

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून मित्रपक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे व नागपूरमध्ये शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेने महायुतीतील समन्वयाची भूमिका निभावत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली असती, तर पाचही जागांवर महायुतीला विजय मिळवता आला असता, असा दावा बन यांनी केला. पुण्यातील एका जागेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शिवसेनेने मित्रपक्षांसमोर अडचणी निर्माण केल्या आणि परिणामी तीन जागा जिंकण्याची संधी महायुतीने गमावली, अशी टीकाही त्यांनी केली.

या विधानामुळे भाजप आणि शिंदेसेनेतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी कोणावर निश्चित होते आणि पक्षांतर्गत आढाव्यानंतर कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान

ठाकरे-शिंदे शिवसेना एकत्र येणार? खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; गुलाबराव पाटील आणि भरत गोगावले यांचीही प्रतिक्रिया.

Nov 12, 2026
सुजय विखे पाटील झाले अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी

सुजय विखे पाटील झाले अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी

अहिल्यानगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात आघाडीचे वर्चस्व. सुजय विखे अध्यक्षपदी, तर रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी निवडले गेले.

Nov 12, 2026
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाआधीच राजकीय भूकंप? अजितदादा महायुतीची साथ सोडणार होते; अतुल लोंढेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाआधीच राजकीय भूकंप? अजितदादा महायुतीची साथ सोडणार होते; अतुल लोंढेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत नवा ट्विस्ट! अजित पवार महायुती सोडणार होते, असा अतुल लोंढेंचा दावा; संजय राऊतांनी 20 ते 22 आमदारांबाबत विधान केले.

Nov 12, 2026
अजितदादांच्या राष्ट्रवादीत फूट पडणार? संजय राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरे संतापले!

अजितदादांच्या राष्ट्रवादीत फूट पडणार? संजय राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरे संतापले!

अजित पवार गटातील 20 ते 30 आमदार फुटणार असल्याचा संजय राऊतांचा दावा; सुनील तटकरे संतापले. 41 आमदार एकत्र असल्याचे स्पष्ट करत विलिनीकरणावरही भाष्य.

Nov 12, 2026
गोकुळच्या वादावर हसन मुश्रीफांची माघार; म्हणाले, 'रागाच्या भरात बोलून गेलो, ती माझी चूक झाली!'

गोकुळच्या वादावर हसन मुश्रीफांची माघार; म्हणाले, 'रागाच्या भरात बोलून गेलो, ती माझी चूक झाली!'

गोकुळच्या वादावर हसन मुश्रीफांची भूमिका बदलली? सतेज पाटलांबाबतच्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण; चंद्रकांत पाटलांचाही उल्लेख करत केली कबुली.

Nov 12, 2026