Maharashtra IPS Appointment: महाराष्ट्र गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 12 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापना जाहीर केल्या आहेत. याबाबतचा शासन आदेश 25 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात
परभणी, उमरखेड, गडचिरोली, रत्नागिरी सह विविध उपविभागात मिळाली जबाबदारी
हिंगोली (Maharashtra IPS Appointment) : महाराष्ट्र गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 12 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापना जाहीर केल्या आहेत. याबाबतचा शासन आदेश 25 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथील फेज-2 बेसिक कोर्स 74 आरआर चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या अधिकाऱ्यांची महाराष्ट्र संवर्गात 31 ऑगस्ट 2026 रोजी नियुक्ती होणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांची उप विभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन आदेशानुसार 2023 च्या तुकडीतील अरांक्षा यादव यांची रत्नागिरी, कायांदे पाटील गुरव गंगाधर यांची उमरखेड यवतमाळ, कुमार सुशांत यांची राजुरा चंद्रपूर, मेघना आय. एन. यांची लातूर ग्रामीण, राहुल कुमार यांची परभणी शहर आणि राहुल रमेश आत्राम यांची आर्वी वर्धा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच 2024 च्या तुकडीतील सागर संजय भामरे यांची भामरागड गडचिरोली, ईशानी आनंद यांची अचलपूर अमरावती ग्रामीण, जान्हवी बाळासाहेब शेखर यांची गंगापूर छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, सारदा तेजस सुरदीप यांची भंडारा, शशांत एन. एम. यांची कामठी नागपूर ग्रामीण आणि सुयश कुमार सिंग यांची धानोरा गडचिरोली येथे उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 च्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस महासंचालकांनी न्यायालयीन आदेश आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे. हा आदेश शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.