आठ दिवसांत शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास बॅकेला ताला ठोकोचा शिवसेना (उबाठा)चा इशारा
मलकापुर (Maharashtra Gramin Bank) : तालुक्यातील भानगुरा येथील शेतकऱ्यांना पहिल्या यादीत कर्जमाफी होऊन सुद्धा नवीन पिक कर्जासाठी गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उद्धवसाहेब ठाकरे) गजानन ठोसर यांना दिली.
नवीन पिक कर्जासाठी आज भानगुरा येथील सर्व शेतकऱ्यांना घेऊन गजानन ठोसर यांनी (Maharashtra Gramin Bank) महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक आदित्य सिंग यांना शेतकऱ्यांना त्रास कां देत असल्याचा जाब विचारला व आठ दिवसात अर्ज करणाऱ्या सर्व संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज न दिल्यास सोमवार दि.02 नोव्हेंबर 26 रोजी बँकेला "ताला ठोको" आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, सतीश पाटील, प्रभाकर जावरे, गजानन बावस्कर, राजू रायपुरे, गोदावरी वराडे, संतोष पाटील, अशोक पाटील, गीताबाई टकले, दिलीप काचकुटे, कैलास पटेल, ज्ञानदेव चोपडे, ध्रुव पटेल, पुंजाजी पाटील, ज्ञानेश्वर गावंडे, भागवत पाटील, सुरेश पाटील, सह इतर शेतकरी उपस्थित होते.