महाराष्ट्र ग्रामीण बँक मानोरा

महाराष्ट्र ग्रामीण बँक, मानोरा शाखा व्यवस्थापकाचा मुजोर कारभार चव्हाट्यावर

Maharashtra Gramin Bank Manora: जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी सध्या संकटात असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार मानोरा शहरात समोर

महाराष्ट्र ग्रामीण बँक, मानोरा शाखा व्यवस्थापकाचा मुजोर कारभार चव्हाट्यावर

Maharashtra Gramin Bank Manora

 

कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्याला बँकेतून हाकलल्याचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मानोरा (Maharashtra Gramin Bank Manora) : जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी सध्या संकटात असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार मानोरा शहरात समोर आला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा मानोरा चे व्यवस्थापक शेतकऱ्यांना उद्धट भाषा वापरून मानसिक त्रास देत असून कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक देऊन बँकेतून हाकलून दिल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडे करण्यात आली आहे.

 या (Maharashtra Gramin Bank Manora) प्रकरणी शेतकरी गोपाळकृष्ण नामदेव चव्हाण, रा. नविन सोनखास, ता. मं.पीर, जि. वाशिम (शेत मौजा देवठाणा, ता. मानोरा, शेत स.नं. १७९, क्षेत्र १ हे. ९९ आर) या शेतकऱ्याने दि. १३-१०-२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे विनंती अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार शेतकरी चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आतापर्यंत निर्विघ्नपणे शेतीसाठी बँकेतून कर्ज मिळत होते. अहिल्यादेवी होळकर शेती पीक कर्ज माफी २०२६ मार्फत त्यांचे कर्ज माफ देखील झाले आहे आणि त्यांनी त्याबाबतचा उल्लेखही अर्जात केला आहे. त्यांच्यावर कोणतीही थकबाकी नसल्याचे त्यांनी हस्तलिखित शेऱ्यात "माझ्याकडे कोणत्याही बँकेचे कर्ज नाही आहे" असे नमूद केले आहे.

तरीही सध्याच्या शाखा व्यवस्थापकाने मनमानी सुरू केली आहे. चव्हाण यांच्या अर्जानुसार  शाखा व्यवस्थापक मनमानी उद्धट भाषा वापरून शेतकऱ्यांना मानसीक त्रास देतात आणि माझ्या अर्जाचा विचार न करता ते आम्हाला बँकेतून हाकलून देतात आणि म्हणतात की, तुमच्याकडून जे होईल ते करा. मी कर्ज मंजूर करणार नाही. अपमानीत करतात. जर बँक व्यवस्थापक असेच उत्तर देत असतील तर आम्ही कोणाकडे कर्ज मागायचे हा प्रश्न आमच्यासमोर येतो, अशी व्यथा गोपाल कृष्ण चव्हाण या  शेतकऱ्याने मांडली आहे.

 या उद्दाम वर्तनामुळे (Maharashtra Gramin Bank Manora) बँक व्यवस्थापकाकडून खालील कायदे व नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा कायदेशीर मुद्दा या प्रकरणात उपस्थित होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मास्टर डायरेक्शनचा भंग :- आरबीआय च्या केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) व प्रायोरिटी सेक्टर लीडिंगच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्याला १४ दिवसांत पीक कर्ज देणे बंधनकारक आहे. लेखी व संयुक्तिक कारणाशिवाय कर्ज नाकारता येत नाही. ग्राहकाला उद्धट वागणूक देणे, सेवेत त्रुटी  करणे हे बँकिंग लोकपालकडे तक्रार करण्यास पात्र कारण आहे. 

 शासकीय बँकेने कर्ज नाकारल्यास शेतकरी खासगी सावकाराकडे जाण्यास भाग पडतो, ज्यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार घडतात, याची जबाबदारी कोणाची ? सदर व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करून सदर विषयाची सखोल चौकशी करण्यात यावी व शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्याला तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.