Mahalaxmi Express Robbery

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री दरोडा! सिग्नलच्या वायर कापून ट्रेन थांबवली, दोन महिलांचे दागिने लंपास

साताऱ्यात महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा! सिग्नल वायर कापून ट्रेन थांबवली आणि दोन महिलांचे सोन्याचे दागिने लुटले.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री दरोडा! सिग्नलच्या वायर कापून ट्रेन थांबवली, दोन महिलांचे दागिने लंपास

साताऱ्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांचा थरार; १५ मिनिटे एक्स्प्रेस रोखली, ५२ हजार ६०० रुपयांचे दागिने चोरीला

सातारा : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला लक्ष्य करत चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेच्या वायरची तोडफोड करून चोरट्यांनी धावती एक्स्प्रेस थांबवली. त्यानंतर डब्यांच्या खिडक्यांमधून हात घालून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेत एकूण ५२ हजार ६०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.

पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. चोरट्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसचा मार्ग रोखण्यासाठी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील वायर कापल्या. परिणामी, एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळ थांबली. सुमारे १५ मिनिटे रेल्वेची वाहतूक रोखून धरल्यानंतर चोरट्यांनी डब्यांमध्ये प्रवेश करून चोरी केली.

एस-२, एस-३ आणि एस-५ डब्यांना चोरट्यांचे लक्ष्य

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन अचानक थांबल्याने प्रवाशांना सुरुवातीला नेमके काय घडले, याचा अंदाज आला नाही. अनेक प्रवासी गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी संधी साधली. एक्स्प्रेसमधील एस-२, एस-३ आणि एस-५ या डब्यांमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला.

यावेळी मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनाथ तुपे आणि खोपोली येथील सुरेखा खाडे या दोन महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी कोल्हापूरला प्रवास करत होत्या. चोरट्यांनी खिडकीतून हात घालून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढताना चोरट्यांनी रेल्वेवर दगडफेकही केली. या प्रकारामुळे डब्यांमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पहाटे सव्वापाचपर्यंत सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सिग्नल यंत्रणेच्या वायरची तोडफोड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.

या प्रकरणी सिग्नल यंत्रणेची तोडफोड केल्याबद्दल लोणंद आरपीएफमध्ये, तर महिला प्रवाशांचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास

दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून विविध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. सिग्नल यंत्रणेची तोडफोड नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली, तसेच या संपूर्ण प्रकारामागे पूर्वनियोजित कट होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पुढील तपास आणि कारवाईसाठी पोलिसांचे पथक साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करून घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमधील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संबंधित सामग्री

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

कळंबोलीत नाकाबंदीदरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला कारने २०० मीटर फरफटले. दिलीप भोई गंभीर जखमी; बनावट नंबर प्लेट असलेल्या कारमधील आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

राजगुरुनगरमध्ये गाडीला कट मारल्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांचा शिवम करमारेवर कोयत्याने हल्ला. तीन बोटे तुटली, शरीरावर ७०० टाके.

Nov 11, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
 पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पुण्यातील विमाननगरमध्ये पबमधील वादातून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक.<br/>

Nov 09, 2026
लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून सात वर्षीय अरमानची हत्या केल्याचा आरोप. याप्रकरणी ५८ वर्षीय वडिलांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

Nov 09, 2026