Madhuri Elephant

माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PETA ला 25 हजारांचा दंड

माधुरी हत्तीण प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! वनतारात पाठवण्याची PETA ची याचिका फेटाळली; संस्थेला 25 हजारांचा दंड.

माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PETA ला 25 हजारांचा दंड

Madhuri Elephant

माधुरीला पुन्हा वनतारात पाठवण्याची मागणी करणारी PETA India ची याचिका फेटाळली; कोल्हापूरकरांच्या लोकलढ्याला कायदेशीर बळ

कोल्हापूर : माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षात कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. माधुरीला पुन्हा गुजरातमधील वनतारा प्रकल्पात पाठवण्याची मागणी करणारी PETA India ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, संस्थेला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे माधुरीच्या नांदणी मठातील वास्तव्यासंदर्भातील लढ्याला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

सुप्रीम कोर्टाने PETA ला फटकारले

माधुरी हत्तीणीला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आले होते. या निर्णयाला कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध केला. माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी नागरिक, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन केले. अखेर तिला मठात परत आणण्यात आले होते.

मात्र, माधुरी पुन्हा मठात आल्यानंतर तिच्या देखभालीवरून PETA India ने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. माधुरीला फटक्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आणि तिला साखळदंडात बांधून एकाकी ठेवण्यात येत असल्याचा दावा संस्थेने केला होता. तिला पुन्हा वनतारा प्रकल्पात पाठवण्याची मागणीही करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने PETA च्या याचिकेवर प्रश्न उपस्थित केला. सर्वजण आनंदी असताना संस्थेला नेमकी कोणती अडचण आहे, असा सवाल न्यायालयाने केला. त्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळत PETA ला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

माधुरीला पुन्हा वनतारात पाठवण्याची मागणी का केली?

PETA India या प्राणी संरक्षण संस्थेने नांदणी (शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठात माधुरीला परत आणण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. वनतारातून तिला पुन्हा मठात हलवण्याची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

माधुरी कोल्हापुरात परतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, मोठ्या आवाजात घोषणा दिल्या गेल्या आणि ढोल-ताशे वाजवण्यात आले, असा आक्षेप PETA ने नोंदवला होता. त्यानंतर तिला साखळदंडात बांधून शेडमध्ये एकाकी ठेवण्यात येत असल्याचेही संस्थेचे म्हणणे होते.

माधुरीच्या आरोग्याबाबत PETA चे गंभीर दावे

माधुरी सुमारे 33 वर्षे मठात राहिल्यामुळे तिच्या पायांना दुखापत झाली आणि गुडघ्यांना सूज आली होती, असा दावा PETA India ने केला होता. डांबरी रस्त्यावर चालणे तसेच कठीण पृष्ठभागावर उभे राहणे तिला त्रासदायक ठरत असल्याने तिला वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्याचेही संस्थेने नमूद केले होते.

या कारणांवरून माधुरीला पुन्हा वनतारात पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने PETA ची याचिका फेटाळल्याने या प्रकरणात संस्थेला मोठा धक्का बसला आहे.

कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला महत्त्वाचे यश

माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर लोकलढा उभारण्यात आला होता. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनीही तिला मठाबाहेर हलवण्यास विरोध केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. माधुरीच्या वास्तव्याबाबत आणि तिच्या देखभालीबाबत सुरू असलेल्या चर्चेत या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित सामग्री

मराठी साहित्यविश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन

मराठी साहित्यविश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन

मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापुरात निधन. वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी साहित्यविश्वात शोककळा.

Nov 07, 2026
OBC आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! क्रिमी लेअरच्या निकषांवर केंद्राला झटका

OBC आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! क्रिमी लेअरच्या निकषांवर केंद्राला झटका

OBC आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! क्रिमी लेअर निकषांवर केंद्राची याचिका फेटाळली; पात्र IAS, IPS उमेदवारांना दिलासा.

Nov 06, 2026
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! ओबीसी विद्यार्थ्यांचा भत्ता वाढला, वाहनधारकांना ई-चलनात सवलत आणि नागपूरमध्ये ६४४ कोटींच्या कृषी प्रकल्पाला मंजुरी.

Nov 04, 2026
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; क्लिप देण्यास तयारी, मात्र जरांगेंनी घातली मोठी अट!

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; क्लिप देण्यास तयारी, मात्र जरांगेंनी घातली मोठी अट!

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी! क्लिप देण्यास तयारी, मात्र स्रोत सांगण्यापूर्वी सुरक्षेची हमी मागितली.

Nov 04, 2026
अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ! ED कडून ५१० कोटींची मालमत्ता जप्त; दोन खासगी विमानांचाही समावेश

अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ! ED कडून ५१० कोटींची मालमत्ता जप्त; दोन खासगी विमानांचाही समावेश

अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ED ची मोठी कारवाई! ५१० कोटींची मालमत्ता आणि दोन खासगी विमाने जप्त; एकूण जप्ती २३ हजार कोटींवर.

Nov 04, 2026