Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

LPG e-KYC

घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी अपडेट; e-KYC ची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.


घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी अपडेट e-kyc ची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

LPG e-KYC |

आधार व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा मुदतवाढ; e-KYC न केल्यास सिलिंडर बुकिंग, सब्सिडी आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून LPG कनेक्शनसाठी आवश्यक असलेल्या e-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत आता ३१ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. यापूर्वीही या प्रक्रियेसाठी दोनदा मुदत वाढवण्यात आली होती. अद्याप e-KYC पूर्ण न केलेल्या ग्राहकांना कंपन्यांकडून मेसेज पाठवून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.

आधार व्हेरिफिकेशनची सुरुवातीची अंतिम तारीख १६ ऑगस्ट होती. त्यानंतर ती वाढवून २३ ऑगस्ट करण्यात आली आणि आता पुन्हा मुदतवाढ देत ३१ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

e-KYC न केल्यास काय परिणाम होऊ शकतो?

निर्धारित वेळेत e-KYC पूर्ण न केल्यास ग्राहकांना LPG सेवेबाबत काही अडचणी येण्याची शक्यता आहे. घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या LPG सिलिंडरचा लाभ तात्पुरता थांबवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत e-KYC पूर्ण होईपर्यंत सिलिंडर कमर्शियल दराने घ्यावा लागू शकतो. कमर्शियल LPG चा दर घरगुती सिलिंडरच्या तुलनेत अधिक असतो.

याशिवाय काही ग्राहकांची सिलिंडर बुकिंग प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे. तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सब्सिडीवरही परिणाम होऊ शकतो. ही प्रक्रिया जुन्या तसेच नवीन LPG ग्राहकांसाठी लागू असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, केवळ e-KYC केले नाही म्हणून LPG कनेक्शन तात्काळ रद्द केले जाणार नाही. मात्र दीर्घकाळ ही प्रक्रिया प्रलंबित ठेवल्यास कनेक्शन ब्लॉक होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

घरबसल्या मोबाइलवरून e-KYC करण्याची सुविधा

LPG ग्राहकांना e-KYC करण्यासाठी गॅस एजन्सीत प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने पूर्ण करता येते.

मोबाइलवरून प्रक्रिया करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या LPG कंपनीचे अधिकृत अॅप डाउनलोड करावे. Indane, HP Gas आणि Bharat Gas यांच्या अॅपमध्ये e-KYC संबंधित सुविधा उपलब्ध आहे. अॅपमधील e-KYC पर्याय निवडल्यानंतर आवश्यक माहिती भरून आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करता येते.

त्यामुळे अंतिम दिवसाची प्रतीक्षा न करता ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी e-KYC पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी सोयीचे ठरू शकते. यामुळे भविष्यात सिलिंडर बुकिंग तसेच सब्सिडीचा लाभ घेताना उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यास मदत होऊ शकते.

Related to this topic: