Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Love Triangle

नागपुरात त्रिकोणी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या; चाकूच्या वारात गौरव रगडेचा मृत्यू

त्रिकोणी प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नागपुरातील नरेंद्रनगर परिसरात घडली.


नागपुरात त्रिकोणी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या चाकूच्या वारात गौरव रगडेचा मृत्यू

दोन मित्र आणि एका तरुणीच्या प्रेमसंबंधातून वाद चिघळला; बेलतरोडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले

नागपूर : त्रिकोणी प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नागपुरातील नरेंद्रनगर परिसरात घडली. सुंदरबन परिसरात झालेल्या झटापटीदरम्यान गौरव रगडे याच्यावर चाकूने वार करण्यात आले. गंभीर अवस्थेत त्याला मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत गौरव रगडे याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्यासह एकूण नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. तो अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.

तपासादरम्यान रगडेचे गेल्या दोन वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच तरुणीसोबत रगडेचा मित्र गौरव राऊत याचेही संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याच कारणावरून दोन्ही मित्रांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद वाढत होता.

घटनेच्या दिवशी संबंधित तरुणी गौरव राऊतच्या घरी पार्टीसाठी गेल्याचे रगडेला समजले. त्यानंतर संतप्त झालेल्या रगडेने राऊतच्या घरावर दगडफेक केली तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. परिस्थिती बिघडल्यानंतर गौरव राऊत आणि त्याचे मित्र घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडून तेथून पळाले.

मात्र, रगडेने त्यांचा पाठलाग केला. पुढे सुंदरबन नाल्याजवळ गौरव रगडे आणि गौरव राऊत यांच्यात जोरदार झटापट झाली. याच दरम्यान रगडेच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्यावरच वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रगडे गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी गौरव राऊत आणि अभिषेक वासनिक या दोघांना ताब्यात घेतले आहे. हत्या नेमकी कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे झाली, याचा सखोल तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत. या घटनेनंतर नरेंद्रनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related to this topic: