परभणी बिबट्या हल्ला

परभणीत बिबट्याने वासराचा फडशा पाडला; शेतकर्‍यांमध्ये भीती

Parbhani Leopard Attack: बिबट्याने हल्ला करून गाईच्या वासराला ठार केल्याची घटना शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

परभणीत बिबट्याने वासराचा फडशा पाडला; शेतकर्‍यांमध्ये भीती

Parbhani Leopard Attack

परभणीतील जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा शिवारातील घटना बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी...!

परभणी (Parbhani Leopard Attack) : जिंतूर  तालुक्यातील खोलगाडगा शिवारात बिबट्याने हल्ला करून गाईच्या वासराला ठार केल्याची घटना रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

खोलगाडगा येथील शेतकरी अशोक जनार्दन घुकसे यांनी गट क्रमांक ८८ मधील शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली होती. शुक्रवारी रात्री ते घरी गेले असता, रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. तसेच त्याला सुमारे दहा फूट ओढत नेले. शनिवारी सकाळी घुकसे हे दूध काढण्यासाठी शेतातील आखाड्यावर गेले असता, वासरू दिसून आले नाही. शोध घेतल्यानंतर ते मृतावस्थेत आढळले. त्यांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली. वनरक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

सध्या रब्बी हंगामातील पेरणी व शेतीची कामे सुरू असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाणे धोक्याचे वाटत आहे. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, नागरिकांनी जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधावीत, रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि (Parbhani Leopard Attack) बिबट्या दिसल्यास वन विभागाला तातडीने कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टैग्स: Parbhani Leopard Attack