लातूर जिल्हा परिषद प्रशासन

मंजुरी नसलेल्या कामांची 'वर्क ऑर्डर; काँग्रेस गटनेत्यांचा आरोप 

Latur Zilla Parishad:जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची, स्थायी समितीची मंजुरी नसताना जिल्हा परिषदेने कोट्यावधी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर काढली, जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेता आशाताई भिसे..

मंजुरी नसलेल्या कामांची 'वर्क ऑर्डर; काँग्रेस गटनेत्यांचा आरोप 

Latur Zilla Parishad

 

लातूर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी, पदाधिकाऱ्यांची मनमर्जी

लातूर (Latur Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची तसेच स्थायी समितीची मंजुरी नसताना जिल्हा परिषदेने कोट्यावधी रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर काढली, असा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेता आशाताई भिसे यांनी केला. सोमवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत याबाबत आपण जाब विचारला असता आपणास बोलू दिले नाही. जिल्हा परिषदेत मोठ्या अनियमिततेने कामे सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या गटनेता आशाताई भिसे यांनी केला. जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी सुरू असून त्यांना पाठीशी घालत पदाधिकाऱ्यांचीही मनमर्जी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील दवाखान्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली. याबाबत आपण माहिती घेत असताना जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या या अनागोंदी कारभाराचे एक एक धागे हाती आले, असे सांगून आशाताई भिसे यांनी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या मनमानीला पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषदेचे सत्ताधारी पदाधिकारी करीत आहेत, आता आरोप त्यांनी केला.

लातूर जिल्हा परिषदेत (Latur Zilla Parishad) सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत आपण स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाविषयी विषय उपस्थित केला असता, आपणास त्यावर न बोलता इतर विषयावर बोला, दुष्काळाच्या विषयावर बोला, असे सांगून बोलू दिले नाही, असा आरोपही भिसे यांनी यावेळी केला. एखाद्या कार्यक्रमाचा मंच लावणे, दिवे लावणे यासाठीचे पेमेंट होणे साहजिक आहे, मात्र कार्यक्रमासाठी लावलेला मंच काढणे आणि दिवे काढणे यासाठीही जिल्हा परिषदेने खर्च केला. सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेला पैसा अशा पद्धतीने खर्च करून जिल्हा परिषदेत प्रशासनाने मनमानी लावली आहे. ही मनमानी थांबली पाहिजे, यासाठी आपण बोलत होतो. मात्र जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत आपणास बोलू दिले नाही, असा आरोप सौ. भिसे यांनी केला.

या (Latur Zilla Parishad) पत्रकार परिषदेला सुभाष पवार, सोनाली थोरमोटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत स्थायी समितीची सभा आपण उपस्थिती केलेल्या प्रश्नामुळे स्थगित करण्यात आली. तासाभरानंतर पुन्हा सभा सुरू झाली. आपण जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना या कामाबाबतचे नियम विचारले असता, 'ते पाहून सांगतो,' असे कार्यकारी अभियंतांनी सांगितले. शिवाय अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम या सभेत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केला, असा आरोप गटनेत्या भिसे यांनी केला. 

उपेक्षितांच्या नेत्याच्या स्मारकाची उपेक्षा...
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक जिल्हा परिषदेत झाले. त्यासाठी प्रशासनाने मनमानी पद्धतीने खर्च केला. मात्र या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारकाची साफसफाई व स्वच्छता केली जात नाही. स्मारकाच्या ठिकाणी असलेल्या झाडांना व हिरवळीला पाणी दिले जात नाही. ज्या नेत्याने आयुष्यभर उपेक्षितांसाठी लढा दिला, उपेक्षितांसाठी काम केले, त्या नेत्यांच्या स्मारकाची उपेक्षा जिल्हा परिषदेत होत आहे. याकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भिसे यांनी यावेळी केला.

संबंधित सामग्री

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर.

Nov 06, 2026
दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

Food and Drug Administration: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ, अवैध साठवणूक आणि निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष मोहीम...

Nov 04, 2026
तुकाराम मुंढेंच्या कारवाईला नरहरी झिरवळांची स्थगिती; रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवरून नवा वाद

तुकाराम मुंढेंच्या कारवाईला नरहरी झिरवळांची स्थगिती; रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवरून नवा वाद

तुकाराम मुंढेंच्या एफडीए कारवाईला नरहरी झिरवळांची स्थगिती. रांजणगावच्या मिथेनॉल कंपनी प्रकरणामुळे महाराष्ट्रात नवा वाद.

Nov 02, 2026
सेलू, परभणीत अन्न प्रशासनाची छापेमारी

सेलू, परभणीत अन्न प्रशासनाची छापेमारी

Food Administration Raids: सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र मोहिमेंतर्गत सणासुदीच्या काळात परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने छापेमारी करण्यात आली आहे. सेलू, परभणी शहर या ठिकाणी छापे

Oct 23, 2026
पादचारी क्रॉसिंगच्या दिरंगाईवर सुप्रीम कोर्ट संतप्त; म्हणाले, 'आम्हीच धरणे धरणार!'

पादचारी क्रॉसिंगच्या दिरंगाईवर सुप्रीम कोर्ट संतप्त; म्हणाले, 'आम्हीच धरणे धरणार!'

दिल्ली हायकोर्टाजवळील पादचारी मार्गाच्या दुरुस्तीतील विलंबावर सुप्रीम कोर्ट संतप्त. प्रशासनाला २५ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा.

Oct 17, 2026