लातूर पाणी बँक

'पाणी बँक'साठी लातूर जिल्ह्यात पुनर्भरण विशेष मोहीम

Latur Water Bank: महाराष्ट्र शासनाच्या जागतिक बँक साहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील दुष्काळप्रवण गावांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणी आडवा, पाणी जिरवा

'पाणी बँक'साठी लातूर जिल्ह्यात पुनर्भरण विशेष मोहीम

Latur Water Bank

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे, विहीर व बोअरवेलवर भर

लातूर (Latur Water Bank) : महाराष्ट्र शासनाच्या जागतिक बँक साहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील दुष्काळप्रवण गावांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी "पाणी आडवा, पाणी जिरवा" ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेततळे, विहीर पुनर्भरण आणि बोअरवेल पुनर्भरण या तीन प्रमुख घटकांवर विशेष भर देण्यात येत असून ही योजना शेतकऱ्यांच्या भविष्यातील पिढीसाठी (Latur Water Bank) 'पाणी बँक' निर्माण करणारी ठरणार आहे.

प्रकल्पांतर्गत पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी १५x१५x३ मीटर आकाराचे शेततळे तयार केले जाते, ज्याची एका भरात तब्बल ७.५ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते. या (Latur Water Bank)  साठवलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांना वेळेवर संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे. भूजल पातळी सुधारण्यासाठी विहीर पुनर्भरण ही अत्यंत प्रभावी पद्धत ठरत आहे. यामध्ये शेततळ्यातील व ओढ्यातील पाणी वाळू, खडी आणि जाळीच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या फिल्टर करून विहिरीत सोडले जाते. यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत १० ते १५ फुटांनी वाढ होऊन कडक उन्हाळ्यातही विहिरींना पाणी टिकून राहण्यास मोठी मदत होते.

तसेच बोअरवेल (उपनलिका) पुनर्भरणाद्वारे पावसाचे पाणी थेट जमिनीत जिरवले जाते, ज्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या (Latur Water Bank)  प्रक्रियेमुळे बोअरवेलच्या पाण्याचा टीडीएस १२२० वरून ६०० पर्यंत खाली येऊन पाण्याची क्षारता कमी होते आणि बोअरवेलचे आयुष्य ५ ते ७ वर्षांनी वाढते. यासोबतच जमिनीचा खारवटपणा कमी होऊन तिची सुपीकता वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे, एका शेतकऱ्याने बोअरवेल किंवा विहीर पुनर्भरण केल्यास त्याच्या परिसरातील ३ ते ४ शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरींनाही त्याचा प्रत्यक्ष फायदा होतो.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा: जाधव
पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेमुळे पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होत आहे, तसेच जमिनीचे मूल्यही वाढण्यास मदत होत आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या (Latur Water Bank)  योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक कृषीताई किंवा तालुका कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

टैग्स: Latur Water Bank