Latur News

राजीनामा द्या अन् मैदानात या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना निलंगेकरांचे आव्हान

लातूर बँक निवडणुकीवरून राजकीय वाद; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आव्हान. काँग्रेससोबत जायचे तर राजीनामा द्या, अशी मागणी.

राजीनामा द्या अन् मैदानात या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना निलंगेकरांचे आव्हान

लातूर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस नेत्याच्या गाडीत बसून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आपल्या नातलगाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यातून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे. काँग्रेससोबत लढायचे असेल, तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मैदानात यावे, असे आव्हान निलंगेकर यांनी दिले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ऐनवेळी महायुतीची साथ सोडून काँग्रेससोबत जात आपल्या नातलगाची उमेदवारी दाखल केली. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना हे आव्हान दिले.

‘सहकार पॅनल’चे नाव बाबासाहेब पाटलांनीच सुचविले

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार रमेश आप्पा कराड यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत महायुतीच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी ‘सहकार पॅनल’ हे नाव सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीच सुचविले होते, असे निलंगेकर यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत बदल करण्याचे काम सहकार विभागाच्या माध्यमातून बाबासाहेब पाटील यांनी केले, असा आरोपही त्यांनी केला. मतदार यादीतून आपले नाव काढून त्याऐवजी आपल्या भाच्याचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचा दावा निलंगेकर यांनी केला. यासंदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेससोबत जायचे तर राजीनामा द्या!

सहकार मंत्र्यांनी या निवडणुकीत आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला. दोन दिवसांपूर्वी महायुतीसोबत निवडणूक लढविण्याचे ठरले असताना ऐनवेळी बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस नेत्याच्या गाडीत बसून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आपल्या नातलगाचा उमेदवारी अर्ज दाखल केला, असे ते म्हणाले.

काँग्रेससोबत एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणे हे महायुती सरकारमधील मंत्री म्हणून त्यांच्या अधिकारात बसत नसल्याचे सांगत, काँग्रेससोबत लढायचे असेल तर त्यांनी राजीनामा देऊन मैदानात यावे, असे खुले आव्हान निलंगेकर यांनी दिले.

२०१९ मध्ये बाबासाहेब पाटील काँग्रेसचे उमेदवार राहतील!

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण बैठक घेतली होती. बाबासाहेब पाटील आपल्यापेक्षा ज्येष्ठ असल्याने त्यांना वैयक्तिक विनंतीही केली होती. मात्र, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुतीत दुपळी निर्माण झाल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हे कायम महायुतीसोबत आहेत. विधान परिषदेसाठी सतीश चव्हाण हे उमेदवार असून, सर्वांनी एकत्र यावे, असा आग्रह संजय बनसोडे यांचा असतो. मात्र, बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेससोबत जाऊन महायुती आणि सरकारची बदनामी केल्याचा आरोपही निलंगेकर यांनी केला.

यावेळी त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत, बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहणार नाहीत, तर काँग्रेसचे उमेदवार राहतील, अशी भविष्यवाणीही वर्तविली.

संबंधित सामग्री

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेस आक्रमक!

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेस आक्रमक!

Latur Congress turns aggressive: काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकाची विटंबना करत ते फाडल्याच्या निषेधार्थ बुधवारी लातूर येथे काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोध.

Nov 18, 2026
भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; राहुल गांधींचा दावा

भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; राहुल गांधींचा दावा

Rahul Gandhi: भारताची अर्थव्यवस्था गंभीर संकटाच्या दिशेने वाटचाल करत असून, देशातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. तसेच शिक्षण व्यवस्थेतही अनेक त्रुटी असल्याचा दावा

Nov 18, 2026
शेकडो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; धामणगावात नेमकं काय घडलं?

शेकडो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; धामणगावात नेमकं काय घडलं?

अमरावतीत भाजपला मोठा धक्का! प्रताप अडसड यांच्या मतदारसंघातील रामदास निस्ताने यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.

Nov 18, 2026
बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर संजय राऊत संतापले; शिंदे गटाला दोन शब्दांत सुनावलं 'बकवास लेकाचे'

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर संजय राऊत संतापले; शिंदे गटाला दोन शब्दांत सुनावलं 'बकवास लेकाचे'

शायना एनसी यांच्या कृतीवरून राजकीय वाद; संजय राऊतांचं दोन शब्दांत टीकास्त्र, तर मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची घोषणाबाजी.

Nov 18, 2026
सांगली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्तेची मोहर! महेंद्र लाड अध्यक्ष, तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

सांगली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्तेची मोहर! महेंद्र लाड अध्यक्ष, तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड. गोपीचंद पडळकर यांच्या अनुपस्थितीची चर्चा.

Nov 18, 2026