Latur murder case: बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर झालेल्या मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या किरण कालिदास सगर याच्या खून प्रकरण
लातूर (Latur murder case) : बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर झालेल्या मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या किरण कालिदास सगर याच्या खून प्रकरणी पोलिसांनी अखेर सापळा रचून वासनगाव पाटी येथे दोघांना अटक केली. बालाजी मोतीराम मस्के, (वय ४४ वर्षे, रा. बौद्धविहाराच्या पाठीमागे, बाभळगाव, ता. जि. लातूर) व २) बालाजी हनुमंत फिस्के, (वय ३४ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. ओम हनुमे मंगल कार्यालयासमोर, महाराणा प्रताप नगर, लातूर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर किरण कालिदास सगर याच्यावर पाच जणांनी मिळून लाठी-काठ्यांनी हल्ला केला. या (Latur murder case) मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या किरण सगर यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 29 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१५/२०२६, कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या (Latur murder case) गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ ऑगस्ट रोजी वासनगाव पाटी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. बालाजी मोतीराम मस्के, (वय ४४ वर्षे, रा. बौद्धविहाराच्या पाठीमागे, बाभळगाव, ता. जि. लातूर) व २) बालाजी हनुमंत फिस्के, (वय ३४ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. ओम हनुमे मंगल कार्यालयासमोर, महाराणा प्रताप नगर, लातूर) अशी त्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ बाबुराव घाडगे, तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, हरी पतंगे, मोहन सुरवसे, रामदास बाचीफळे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे व संतोष खांडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.