Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर हेल्मेट जनजागृती

हेल्मेटधारकांना पोलिसांचा गुलाब! अप्पर पोलीस अधीक्षकांचा स्तुत्य उपक्रम; हेल्मेटबाबत जनजागृती

Latur Helmet Awareness: तूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गांवर १ सप्टेंबर २०२६ पासून हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणी


हेल्मेटधारकांना पोलिसांचा गुलाब अप्पर पोलीस अधीक्षकांचा स्तुत्य उपक्रम हेल्मेटबाबत जनजागृती

Latur Helmet Awareness |

लातूर (Latur Helmet Awareness) : लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गांवर १ सप्टेंबर २०२६ पासून हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी या उपक्रमाला मानवी आणि सकारात्मक स्वरूप देत अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी औसा हायवेवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

हेल्मेट वापरणाऱ्या चालकांना अशाच पद्धतीने नियमितपणे हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांशी संवाद साधून हेल्मेटचे महत्त्व, अपघाताच्या वेळी होणारी जीवितहानी आणि हेल्मेटमुळे डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून मिळणारे संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक दुचाकीस्वाराने पुढील प्रवासापासून नियमितपणे हेल्मेट वापरावे, असे आवाहन करण्यात आले.

हेल्मेट सक्तीच्या उपक्रमाला (Latur Helmet Awareness) जिल्हाभरातून प्रतिसाद मिळावा यासाठी पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करत आहेत. चाकूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मायने तसेच निलंगा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल दुमे  यांनीही रस्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहून दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले.

हेल्मेट सक्तीचा उपक्रम (Latur Helmet Awareness) केवळ एक-दोन दिवस राबवून थांबविण्यात येणार नसून, जिल्ह्यात हेल्मेट वापरण्याची कायमस्वरूपी संस्कृती रुजविण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. जोपर्यंत लातूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शंभर टक्के हेल्मेट वापरण्याची सवय निर्माण होत नाही, तोपर्यंत या उपक्रमाचा नियमित आढावा घेतला जाणार असल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

7 लाख 87 हजार रुपयांचा दंड वसूल!
हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी एकूण 787 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण 7 लाख 87 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

हेल्मेट घाला, जीवन वाचवा

लातूर पोलीस विभागाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकीवर प्रवास करताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेट हा दंडापासून वाचण्याचा मार्ग नसून अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपल्या कुटुंबाचा विचार करून प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करावे. लातूर पोलिसांच्या या जनकल्याणकारी उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करून स्वतः हेल्मेट वापरावे आणि इतरांनाही हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.