लातूर जिल्हा सहकारी बँक निवडणुक

जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचे पॅनल रोखण्यासाठी वकीलांची फौज मैदानात- आ. संभाजी पाटील निलंगेकर

Latur District Cooperative Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये...

जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचे पॅनल रोखण्यासाठी वकीलांची फौज मैदानात- आ. संभाजी पाटील निलंगेकर

Latur District Cooperative Bank Election

 

देशमुख कुटुंबावर निलंगेकरांचा गंभीर आरोप; पाच उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा

निलंगा (Latur District Cooperative Bank Election) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी वकीलांची फौज उभी करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यावर निशाणा साधताना निलंगेकर म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी बिनविरोध निवडणुकीच्या चर्चा करणाऱ्यांनीच आता सोसायट्या थकबाकीत काढून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण यंत्रणा आपल्या हातात ठेवून विरोधकांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या नादाला लागून स्वतःचे वाटोळ करून घेऊ नये गेली नाही अशी खोचक टीकाही केली.
 
धीरज देशमुख यांच्यावर उपरोधिक टीका करताना निलंगेकर म्हणाले, "धीरज देशमुख यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले पाहिजे. एवढ्या मोठ्या लढाया आजपर्यंत कोणी लढल्या नाहीत. पहिल्या निवडणुकीत ते नोटाच्या विरोधात निवडून आले, ही भारतातील एकमेव केस आहे. आता जिल्हा बँकेतही बिनविरोध निवडून येण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा आत्मा आहे. मात्र, आज या बँकेचा कारभार सहकाराच्या तत्त्वांवर चालत नसून ती देशमुख कुटुंबाची कॉर्पोरेट बँक बनली आहे, अशी टीका निलंगेकर यांनी केली. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेवर एका कुटुंबाचे वर्चस्व निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह पाच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी सध्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायालयीन लढाई सुरू असून, आम्ही कायदेशीर मार्गाने हा लढा देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"जनतेच्या न्यायालयात यायला एवढी भीती का?" असा सवाल उपस्थित करत निलंगेकर म्हणाले, "ग्राउंड तुमचं, कायदे तुमचे, नियम तुमचेच आहेत, मग पराभवाची भीती कशासाठी? निवडणूक खुल्या आणि पारदर्शक वातावरणात होऊ द्या. जनतेलाच कौल देऊ द्या."

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज, थकबाकीदार सोसायट्या आणि मतदानाचा अधिकार या मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. निलंगेकर यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांमुळे आगामी निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

संबंधित सामग्री

आजी-माजी मंत्री 'फिल्डिंग'वर; मतदार सहलीवर! 

आजी-माजी मंत्री 'फिल्डिंग'वर; मतदार सहलीवर! 

Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे मैदान दिवाळीत अगदी गोड गोड झाले असून रविवारी होणाऱ्या मतदानासाठी आता जोरदार राजकीय आडाखे बांधणी सुरू आहे.

Nov 12, 2026
सुजय विखे पाटील झाले अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी

सुजय विखे पाटील झाले अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी

अहिल्यानगर जिल्हा बँकेवर विखे-थोरात आघाडीचे वर्चस्व. सुजय विखे अध्यक्षपदी, तर रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी निवडले गेले.

Nov 12, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी संभाजीराव रणांगणात! लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बनली प्रतिष्ठेची लढाई

कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी संभाजीराव रणांगणात! लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बनली प्रतिष्ठेची लढाई

लातूर जिल्हा बँक निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकरांची खेळी! महायुतीचे पॅनल, नेत्यांमधील मतभेद आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाची लढाई चर्चेत.

Nov 09, 2026
लातूर जिल्हा बँकेच्या चार जागा बिनविरोध! 

लातूर जिल्हा बँकेच्या चार जागा बिनविरोध! 

Latur District Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने व या मतदारसंघात एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने या निवडणुकीत संचालक पदाच्या चार जागा.

Nov 05, 2026