लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

जिल्हा बँकेसाठी 48 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल!

Latur District Central Cooperative Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 48 जण..

जिल्हा बँकेसाठी 48 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल!

Latur District Central Cooperative Bank

 

धीरज देशमुख, अशोक पाटील, अरविंद पाटील, गोविंदराव माकणे, भगवान पाटील यांची उमेदवारी दाखल!

लातूर (Latur District Central Cooperative Bank) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 48 जणांनी एकूण 60 उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासह अशोक शिवाजीराव पाटील, अरविंद दिलीपराव पाटील, भगवान रामचंद्रराव पाटील, जयेश विश्वंभरराव माने, गोविंदराव ग्यानोबा माकणे, अशोक वसंतराव गोविंदपूरकर, छायादेवी श्रीपतराव काकडे, विश्वनाथ शामराव बिराजदार यांचा समावेश आहे.

गुरुवारी (दि.15) 48 जणांचे एकूण 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात रघुनाथ दिलीपराव शिंदे, महेंद्र श्यामराव मुळे, हेमंत बालासाहेब जाधव, विश्वनाथ शामराव बिराजदार, गोरख दासा सावंत, अरविंद दिलीपराव पाटील, अशोक शिवाजीराव पाटील, संगीता अशोकराव पाटील, ओमप्रकाश लक्ष्मण बिरादार, सोनाली प्रमोद पाटील, प्रीती चंद्रशेखर भोसले, बसवराज बाबाराव बिराजदार, नागोराव माणिकराव वलांडे, भगवानराव रामचंद्रराव पाटील, आशिष अजित राजूरकर, प्रकाश बापूराव पाटील, ज्ञानोबा यशवंतराव सूर्यवंशी, अतुल उद्धवराव गंभीरे, जयेश विश्वंभरराव माने, संतोष नानासाहेब पाटील भोसले, गोविंदराव ग्यानोबा माकणे, उमाकांत सुभाषराव देशमुख, धीरज विलासराव देशमुख, भरत तुकाराम चांगले, अशोक वसंतराव गोविंदपूरकर, सर्जेराव शंकरराव भांगे, भरत ज्ञानोबा गोरे, प्रकाश जालिंदर देशमुख, जगन्नाथ गुरुनाथ पाटील, राजकुमार भाऊराव जाधव, दगडू भिकाजी साळुंके, सतीश शेषेराव जाधव, दत्तू निवृत्ती आल्टे, रुचिका सिद्धेश्वर कावळे, चंद्रशेखर प्रभू दंडीमे, बाबुराव हणमंतराव खंदाडे, अमित संजय शेळके, शेषेराव केशवराव हाके, संभाजी गोविंदराव सूळ, ओमप्रकाश गिरीधर नंदगावे, गीतांजली मधुकर लांडगे, छायादेवी श्रीपतराव काकडे, शितल कल्याणराव पाटील आणि सुरेक्षा रमाकांत मुरुडकर यांचा समावेश आहे.

गुरुवार अखेर एकूण 325 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण 69 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
 
उमेदवारी दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Latur District Central Cooperative Bank) निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबरला सकाळी 8  ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे.  या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होणार असून 19 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत. 5 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार असून या निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 16 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 2026 ते 2031 या कालावधीसाठी हे संचालक मंडळ राहणार आहे.

संबंधित सामग्री

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी संभाजीराव रणांगणात! लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बनली प्रतिष्ठेची लढाई

कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी संभाजीराव रणांगणात! लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बनली प्रतिष्ठेची लढाई

लातूर जिल्हा बँक निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकरांची खेळी! महायुतीचे पॅनल, नेत्यांमधील मतभेद आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाची लढाई चर्चेत.

Nov 09, 2026
राजीनामा द्या अन् मैदानात या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना निलंगेकरांचे आव्हान

राजीनामा द्या अन् मैदानात या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना निलंगेकरांचे आव्हान

लातूर बँक निवडणुकीवरून राजकीय वाद; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आव्हान. काँग्रेससोबत जायचे तर राजीनामा द्या, अशी मागणी.

Oct 17, 2026
संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई झाली आहे. १० वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा मुद्दा असून, निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे पाटील म्हणाले.

Sep 19, 2026