लातूर जिल्हा बँक

लातूर जिल्हा बँकेच्या चार जागा बिनविरोध! 

Latur District Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने व या मतदारसंघात एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने या निवडणुकीत संचालक पदाच्या चार जागा.

लातूर जिल्हा बँकेच्या चार जागा बिनविरोध! 

Latur District Bank

 

पंधरा जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात! दोन मतदारसंघात तिरंगी तर इतर मतदारसंघात सरळ लढत

लातूर (Latur District Bank) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने व या मतदारसंघात एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने या निवडणुकीत संचालक पदाच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सौ. शोभा अभिमन्यू पवार, सर्जेराव जनार्धनराव मोरे, अविनाश बाळासाहेब जाधव आणि विवेक हरिश्चंद्र शिरसाठ अशी त्या उमेदवारांची नावे आहेत. संचालकांच्या पंधरा जागांसाठी एकूण 30 उमेदवार निवडणूक रिंगणात असून दोन मतदारसंघात तिरंगी तर इतर सर्व मतदार संघात सरळ लढत होत आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औसा तालुका मतदार संघातून औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ. शोभा अभिमन्यू पवार, रेणापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून सर्जेराव मोरे, अहमदपूर तालुका सोसायटी मतदार संघातून अविनाश जाधव तसेच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून विवेक सिरसाठ यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हे चारही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्हा बँकेच्या (Latur District Bank) संचालक पदाच्या 19 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यातील चार जागा बिनविरोध निवडून आल्याने आता पंधरा जागांवर निवडणूक लागली आहे. याआधी प्रक्रिया मतदारसंघातून धीरज विलासराव देशमुख यांचा एकमेव अर्ज राहिला होता. मात्र विरोधी गटाचे उमेदवार भरत चामले हे निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात गेल्याने न्यायालयाने त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे प्रक्रिया मतदार संघातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांची भरत चामले यांच्याशी लढत होणार आहे.

अशा होत आहेत लढती...
उदगीर तालुका सोसायटी मतदारसंघात बसवराज बिराजदार व प्रीती भोसले, निलंगा मतदार संघात सौ. संगीता पाटील व अरविंद पाटील, देवणी मतदार संघात दिलीप पाटील व भगवानराव पाटील, जळकोट मतदार संघात धर्मपाल देवशेट्टे व आशिष राजूरकर, चाकूर मतदार संघात संतोष पाटील व गोविंदराव माकणे यांच्यात लढत होत आहे. महिला प्रतिनिधी मतदारसंघात शीतल पाटील सुरेखा मुरुडकर व गीतांजली लांडगे, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील सदस्यासाठी शांताबाई साळुंके व शेषराव हाके यांच्यात लढत होत आहे. ओबीसी प्रवर्गात बाबुराव खंदाडे, भरत चामले, चंद्रशेखर दंडीमे हे उमेदवार आहेत. तर प्रक्रिया मतदारसंघातून भरत चामले व विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्यात लढत होत आहेत.

या निवडणुकीत भरतच आमले हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नागरी बँका, पतसंस्था मतदारसंघातून ऋषिकेश कराड व अशोक गोविंदपूरकर यांच्यामध्ये लढत होत आहे. मजूर सहकारी संस्था, वीटभट्टी सहकारी संस्था, औद्योगिक कामगार सहकारी संस्था, औद्योगिक विणकर सहकारी संस्था, ग्रामीण कारागीर सहकारी संस्था, प्रिंटिंग प्रेस सहकारी संस्था मतदार संघात गिरीश पाटील व जगन्नाथ पाटील, मत्स्य, कुक्कुटपालन, मेंढपाळ, हाउसिंग, ग्राहक व औद्योगिक सहकारी वसाहत संस्था मतदारसंघात जयेश माने व दगडू साळुंके आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघात अतुल गंभीरे व प्रकाश पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे.

टैग्स: Latur District Bank

संबंधित सामग्री

जिल्हा बँक निवडणूक: लाईनीत अडकलेल्या संजूभाऊंच्या पदरी निराशा!

जिल्हा बँक निवडणूक: लाईनीत अडकलेल्या संजूभाऊंच्या पदरी निराशा!

Latur District Bank Election: लातूर जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार पॅनलने झेंडा फडकवल्याने सहकार क्षेत्रावर देशमुखांची पकड पुन्हा एकदा मजबूत झाली आहे.

Nov 16, 2026
लातूर जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा!

लातूर जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा!

Latur District Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने 15 पैकी 11 जागा मिळवून दणदणीत विजय मिळविला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पॅनलला 4 जागा मिळाल्या असून...

Nov 16, 2026
आजी-माजी मंत्री 'फिल्डिंग'वर; मतदार सहलीवर! 

आजी-माजी मंत्री 'फिल्डिंग'वर; मतदार सहलीवर! 

Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे मैदान दिवाळीत अगदी गोड गोड झाले असून रविवारी होणाऱ्या मतदानासाठी आता जोरदार राजकीय आडाखे बांधणी सुरू आहे.

Nov 12, 2026
कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी संभाजीराव रणांगणात! लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बनली प्रतिष्ठेची लढाई

कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी संभाजीराव रणांगणात! लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बनली प्रतिष्ठेची लढाई

लातूर जिल्हा बँक निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकरांची खेळी! महायुतीचे पॅनल, नेत्यांमधील मतभेद आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाची लढाई चर्चेत.

Nov 09, 2026
जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात AI चा चिखल!

जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात AI चा चिखल!

Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मैदानात सध्या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी  मतदार, सोसायट्यांचे चेअरमन आणि शेतकऱ्यांची मोठी करमणूक

Nov 05, 2026