लातूर चेक बाऊन्स प्रकरण

चेक बाऊन्स प्रकरणात ऊसतोड ठेकेदाराला सहा महिने कारावास

Latur Cheque Bounce Case: मांजरा साखर गाळप हंगाम २०१४-१५ मधील ऊसतोडणीच्या येणे बाकीपोटी दिलेला धनादेश अनादरित झाल्याने दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात माननीय लातूर न्यायालयाने ऊसतोड ठेकेदार...

चेक बाऊन्स प्रकरणात ऊसतोड ठेकेदाराला सहा महिने कारावास

Latur Cheque Bounce Case

 

मांजरा साखर कारखान्यास ५ लाख रुपये देण्याचे आदेश; ऊस तोड ठेकेदारात खळबळ

लातूर (Latur Cheque Bounce Case) : मांजरा साखर गाळप हंगाम २०१४-१५ मधील ऊसतोडणीच्या येणे बाकीपोटी दिलेला धनादेश अनादरित झाल्याने दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात माननीय लातूर न्यायालयाने ऊसतोड ठेकेदार विजय मोतीराम चव्हाण (रा. नायगाव, जि. नांदेड) यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, ५ लाख ६० हजार ७६४ रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची रक्कम न भरल्यास आणखी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ऊसतोडणीच्या येणे बाकीपोटी २ लाख ८० हजार ३८२ रुपये इतकी रक्कम थकीत होती. या रकमेच्या वसुलीसंदर्भात धनादेश अनादर प्रकरण दाखल करण्यात आले होते. या (Latur Cheque Bounce Case) प्रकरणात लातूर येथील न्यायालयाने वरील निर्णय दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार, दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये मांजरा साखर कारखान्यास देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात मांजरा साखर कारखान्याच्या वतीने ॲड. आर. डी. काळे यांनी काम पाहिले.