लातूर मध्यवर्ती सहकारी बँक

जिल्हा बँकेचा 75 टक्के पैसा अन् 75 टक्के पाणी, देशमुखांनी स्वतःसाठीच वापरले! 

Latur Central Cooperative Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही देशमुख व माझ्यातील व्यक्तिगत लढाई नाही तर ही बँकेची लढाई आहे. ही बँक शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे बँकेवरच बोलू, असे म्हणत..

जिल्हा बँकेचा 75 टक्के पैसा अन् 75 टक्के पाणी, देशमुखांनी स्वतःसाठीच वापरले! 

Latur Central Cooperative Bank

 

माजी मंत्री, आमदार निलंगेकरांचा आरोप; याचे उत्तर शेतकरी मागणारच!

लातूर (Latur Central Cooperative Bank) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही देशमुख व माझ्यातील व्यक्तिगत लढाई नाही तर ही बँकेची लढाई आहे. ही बँक शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे बँकेवरच बोलू, असे म्हणत देशमुख यांनी जिल्हा बँकेचा 75 टक्के पैसा स्वतःसाठी आणि जिल्ह्यातील 75 टक्के पाणी स्वतःसाठी वापरले, असा आरोप करीत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी 'याचे उत्तर तर शेतकरी मागणारच!' अशी भूमिका सोमवारी (दि.19) येथील पत्रकार परिषदेत मांडली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी सभापती गोविंदराव चिलकुरे, संजय दोरवे, मंगेश पाटील, निलंगा पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनीता वाघमारे उपस्थित होत्या. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Latur Central Cooperative Bank) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कराड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सहकार पॅनल असे पॅनलचे नाव सुचवल्याचा दावा आमदार निलंगेकरांनी पुन्हा एकदा केला. जून महिन्यात राज्यातील महायुतीचे समन्वयक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपणास बोलावून घेतले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना फोन करून महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढविण्याची सूचना दिली. त्यानंतर मी वैयक्तिक बाबासाहेब पाटील यांना भेटलो. त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा प्रस्ताव दिला, तो त्यांनी मान्य केला. इतकेच नव्हे, तर बाळासाहेब जाधव यांची भूमिका हीच असल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना दोन-तीन महिन्यांनी याची चाहूल लागली आणि बाबासाहेब पाटील यांनी व्यासपीठावरून काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका मांडली. 

कोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलासा दिला नाही. टंचाईत निवडणुका नको, ही आमची भूमिका होती. मात्र त्यांनी निवडणुका घेण्याची मागणी केली. काँग्रेसच्या नेत्यांची एक जुनीच सवय आहे, ते कधीच समोर येत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांनी वेगळ्या माणसाला पुढे केले, यावेळी बाबासाहेब पाटील यांना पुढे केले. (Latur Central Cooperative Bank) राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या गाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असते, तर त्यात गैर नव्हते. मात्र धीरज देशमुख यांच्या गाडीतून गेले यामुळे त्यांनी पदाची गरीमा राखली नाही, असा हल्ला ही त्यांनी केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाबासाहेब पाटलांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हेत, असा पलटवार करीत केवळ बाबासाहेब पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, असेही निलंगेकर म्हणाले. अरविंद पाटील यांचे स्वतःची ओळख आहे. त्यांनी पक्षात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, असे सांगून कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक आपण लढविणारच, असेही निलंगेकर म्हणाले. मजबूत तरुणांचे आणि बहुजनांचे एकत्रित पॅनल झाले आहे. पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार आहोत, असा निर्धार संभाजीरावांनी बोलून दाखविला. 

दृश्यम् व बँक एकसारखे! 
सध्या आलेल्या दृश्यम् चित्रपटासारखे बँकेचे दृश्य मांडले गेले आहे. दिलीपराव देशमुख हे या 'बँक दृश्यम्'चे दिग्दर्शक आहेत. तेच बँकेचे कौतुक करतात, व्यासपीठावर त्यांचेच नेते असतात. ही (Latur Central Cooperative Bank) बँक शेतकऱ्यांची नव्हे तर देशमुख यांचा आत्मा आहे, अशी बोचरी टीका आमदार संभाजीरावांनी केली. कामकाज चांगले असेल तर लोकशाहीच्या मार्गाने जावे, असे आव्हान देत लोहारा शाखेत केलेल्या प्रकाराचा उल्लेख करीत 'खोड्या का?' असा सवाल त्यांनी केला.

विलासरावांच्या मार्गाने जा...
बँकेत यांना कसले संचालक हवेत, हे सांगताना संभाजीराव म्हणाले, 'बैठकीत प्रत्येक संचालकांच्या समोर काजूची डिश असते. मात्र 'धिरज'ने काजू उचलला तर डायरेक्टर उचलतात. 1995 ला याच प्रवृत्तीमुळे विलासरावांना फटका बसला होता. त्यामुळे 'अमित देशमुख, धीरज देशमुख यांनी विलासरावांच्या पावलावर पाऊल टाकून चालावे, दिलीपरावांच्या नव्हे!' असा सल्लाही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला.

संबंधित सामग्री

काँग्रेसचे विश्वनाथ बिराजदार यांची उमेदवारी मागे; जिल्हा बँकेवर शोभा अभिमन्यू पवार बिनविरोध

काँग्रेसचे विश्वनाथ बिराजदार यांची उमेदवारी मागे; जिल्हा बँकेवर शोभा अभिमन्यू पवार बिनविरोध

Latur Central Cooperative Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औसा तालुका मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ शामराव बिराजदार

Oct 28, 2026